Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची मतदानाच्या दिवशीच सर्वात मोठी मागणी, थेट निवडणूक आयुक्तांवर शरसंधान; म्हणाले, त्यांना तातडीने…

Uddhav Thackeray on Election Commissioner: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तोफ आज राज्य निवडणूक आयोगावर धडाडली. दुबार मतदार, मतदान यादीतील घोळ, पाडू मशीन, मार्कर पेन यावरून आज राज्यभरात गोंधळ उडाला. त्यावरून ठाकरे बंधुंनी राज्य निवडणूक आयोगाला सणसणीत टोले दिले. इतक्यावरच न थांबता उद्धव ठाकरे यांनी मोठी मागणी केली.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांची मतदानाच्या दिवशीच सर्वात मोठी मागणी, थेट निवडणूक आयुक्तांवर शरसंधान; म्हणाले, त्यांना तातडीने...
उद्धव ठाकरे, राज्य निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयुक्त
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 15, 2026 | 2:25 PM

Uddhav Thackeray on Election Commissioner: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची राज्य निवडणूक आयोगाविरोधात तोफ धडाडली. मतदान केल्यानंतरी उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयुक्त पगार कशाचा घेतात, अशी जहरी टीका केली होती. राज्यातील 29 महापालिकेतील सावळ्या गोंधळावर त्यांनी सडकून टीका केली होती. दुबार मतदार, मतदार यादीतील घोळ, पाडू मशीन, मार्कर पेन यावरून त्यांनी एकच टोला लगावला. राज्य निवडणूक आयोग भाजपच्या तालावर नाचत असल्याचा आरोप करत मतदानाच्या दिवशीच त्यांनी सर्वात मोठी मागणी केली.

निवडणूक आयुक्ताचं घरगड्यासारखं काम

Live

Municipal Election 2026

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:47 PM

संभाजीनगर : निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार - किशोर शितोळे

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

10:45 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भरघोस मतदान, सत्ता कुणाची येणार? धाकधूक वाढली

10:43 PM

मालेगावकर घराबाहेर पडले, दणदणीत मतदान

टपाली मतदानावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरले. मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस वेगळे असतात. पूर्वी एकाच दिवशी व्हायचे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडत नाही. निवडणूक अधिकारी प्रभाग २०० ते २०६ मध्ये त्यांनी आज दुपारी ३ वाजता टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंग रुममधून बाहेर काढण्याचे आदेश दिले. हा काय प्रकार आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. त्यांनी या अनागोंदीविषयी जाहीर नाराजी व्यक्त केली.

तर राज्याचा निवडणूक आयुक्त हा मुख्यमंत्र्यांचा घरगडी म्हणून काम करत असल्याची सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी केली. या निवडणूक आयुक्तांना काहीच काम नाही. धाकदपटशा दाखवला. पैसे वाटले. सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहे. साम-दाम दंड भेद केला. तरीही काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. दुसरीकडे मंत्री, भाजप नेते गणेश नाईक यांना निवडणूक केंद्र शोधण्यासाठी चार तास लागले. त्यांना तंगडतोड करावी लागली. टांगा फरार करणाऱ्या नाईकांच्याच टांगा दुखल्या असतील. गणेश नाईकांना मतदान केंद्र शोधण्यासाठी चार तास लागले. या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयुक्तांना निलंबित करा अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक आयुक्त लाचारी करत आहेत, अशी सणसणीत चपराकही उद्धव ठाकरे यांनी लगावली.

यापूर्वी सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया देतानाही त्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांवर तोंडसुख घेतले. मुंबई महापालिकेच्या निवडणूक 9 वर्षांनी होत आहे. तरीही इतका गोंधळ कसा होतो असा सवाल त्यांनी केला. तर निवडणूक आयोग, आयुक्त आणि कर्मचारी काय काम करतात असा सवाल त्यांनी केला होता. हे दररोज काय काम करतात याची माहिती रोज निवडणूक आयोगाच्या साईटवर अपडेट व्हायला हवी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी सकाळी केली होती.