Uddhav Thackeray: ‘जे काम अतिरेक्यांनी केलं, ते सरकार करतंय’, उद्धव ठाकरे यांचा घणाघात, म्हणाले मतदानाचा हक्क नाकारणे…
Uddhav Thackeray on Vote Casting Right: SIR प्रक्रियेवरून अद्यापही वाद शमलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोग गेल्या महिनाभरात एक नव्हे तर तीन चार पावलं मागे आलेला आहे. अनेक बदल करण्यात आले आहे. त्याचवेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण(SIR) प्रक्रियेवरून देशात रणकंदन पेटलेले आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा नवीन आंदोलनाची घोषणा केला आहे. अनेक मतदारांची नावं यादीतून वगळल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याचवेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. त्यांनी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
मतदानाचा हक्क नाकारणे…
आपल्याच देशाने आपलाच मतदानाचा हक्क नाकारणे हे तेंव्हा अतिरेकी तिथे करत होते आता सरकार करतंय की काय असे वाटू लागले आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर केली. मुंबईत वैदेही तामण यांच्या लल देद काश्मीरची आई या पुस्तक प्रकाशन सोहळ्या दरम्यान ठाकरे यांनी अनेक मुद्यांवर मतं मांडलीत. आपल्याच देशाने आपला मतदानाचा हक्क नाकारणं जसं त्यावेळेला अतिरेकी करत होते, तसंच आता सरकार करतंय, असा निशाणा त्यांनी एसआयआर प्रक्रियेवरून केंद्र सरकारवर साधला. आम्ही हिंदू धर्माचे कट्टर, कडवट, अभिमानी आहोत. पण आमचं हिंदुत्व हे देशप्रेमाशी निगडित आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काश्मीरच्या अनेक ठिकाणी बाळासाहेबांची पुजा
वैदेही तामण यांच्या पुस्तकांचं उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक करण्यात आलं. काश्मीरच्या अनेक ठिकाणी बाळासाहेबांची पुजा होते त्यांच्या कामाबद्दल त्यांनी केलेल्या मदतीबद्दल तिथले लोक त्यांची पूजा करतात हे मी ऐकले आहे. वाट दाखवणारा गुरु असतो आता वाट पावणारेही गुरु झालेत. तिर्थावरून येऊन तीर्थप्राशन करणे याला योग्य म्हणता येणार माही. हे पुस्तक मी पूर्ण वाचणार आहे. आपण त्यानेच निर्माण केलेली फुल त्यालाच वाहतो. त्याला भूक लागत नाही तरी आपण त्याला नैवेद्य देतो. भोगण्याची हिम्मत कोणात आहे? असा सवाल त्यांनी केला.
काश्मीर हिंदू मुस्लिमाच्या विषयाने तोडला
पांडित्य म्हणजे वेद येणे किंवा पाठांतर असणे म्हणजे नाही. पाढे येणे म्हणजे गणित येणारच असे नाही. एखादी गोष्टी येण्यासाठी बोलता येणे गरजेचे नाही अर्थ समजणे गरजेचे आहे. या पुस्तकाचा विषय वाचायलाही आणी पचायलाही अवघड आहे. झोपतांना झोपेची गोळी उठायला गजर आणी व्यायाम करायला मशिन लागते. काश्मीर हिंदू मुस्लिमाच्या विषयाने तोडून टाकला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
बहिणाबाईंनीही खुप साध्या शब्दात सांगीतले आहे, अरे माणसा माणसा कधी होशील तू माणूस. दुसर्याचे चांगले करता आले नाही तर त्याचे वाईट करू नका. आपल्यालाही देवानेच निर्माण केले आहे. आपण पत्रिकेत बघतो मंगळ दुसर्या बाजूला माणूस गेलाय मंगळावर माणूस शोधायला. आपल्या संत परंपरेत एक संत दाखवा ज्याने स्वत:ला देव मानले नाही. सर्व माणूस देवाचे सेवक होऊन जगले. आजोबांनी वडीलांना सांगीतले मला माझ्या वडीलांनी मला सांगीतले मी आता आदित्यला सांगतोय, आपल्या मनाचे समाधानच शेवटपर्यत राहते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.