AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतली बातमी, उद्धव ठाकरे यांची ‘स्वबळा’ची तयारी?, पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला; आघाडीत काहीतरी घडतंय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चांगलेच कामाला लागले आहेत. ठाकरेंकडून शिवसेना भवन येथे दररोज बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंनी आज राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

आतली बातमी, उद्धव ठाकरे यांची 'स्वबळा'ची तयारी?, पदाधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला; आघाडीत काहीतरी घडतंय
उद्धव ठाकरे
| Edited By: Chetan Patil | Updated on: Jun 12, 2024 | 5:11 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. काँग्रेस हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. लोकसभेनंतर आता राज्यसभेतही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून एकत्र निवडणूक लढवली जाईल, असं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे आपल्याला किती जागा हव्यात, याबाबत मविआतल्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे जागावाटपावरुन बोलणी फिस्कटली तर महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवू शकतात. पण ते आघाडीसाठी थोडं घातक ठरु शकतं. अर्थात याबाबत काय-काय घडामोडी घडतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चांगलेच कामाला लागले आहेत. ठाकरेंकडून शिवसेना भवन येथे दररोज बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे ठाकरेंनी आज राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पदाधिकाऱ्यांकडे प्रत्येक मतदारसंघांचा थेट A टू Z माहितीचा अहवाल मागवला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता विधानसभेत तयारीनीश उतरण्याच्या तयारीत आहेत हे स्पष्ट होत आहे.

लोकसभेनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून विधानसभानिहाय उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. लोकसभेच्या निकालावरून आपण मित्रपक्षांसोबत अथवा स्वतंत्र विधानसभा लढली तर काय होईल? याचा अहवाल मागितला. विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाला अनुकूल आहे का? असल्यास उमेदवार कोण असावा? तसेच संभाव्य विजयाचे समीकरण कसं असेल? याबाबत ठाकरेंनी अहवाल मागितला आहे. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये स्वतःच्या उमेदवाराचे तसेच मित्रपक्षांच्या उमेदवाराचे, पदाधिकारी यांनी काम केलं की नाही? याबाबतचा अहवाल मागितला आहे.

विधानसभा संपर्कप्रमुख अहवाल कसा बनवणार?

  • १. लोकसभा निवडणूक २०२४ चे विधानसभा मतदारसंघ निहाय निकाल
  • २. यादीप्रमाणे पूर्ण बुथप्रमुख होते का? न होण्याची कारणे, असल्यास कार्यरत होते का?
  • ३. शिवसेना उमेदवाराचे काम महाविकास आघाडीमधील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले का?
  • ४. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले का?
  • ५. सदर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेस अनुकूल आहे का? असल्यास संभाव्य उमेदवार कोण असावा?
  • ६. संभाव्य विजयाचे समिकरण कसे असेल?
  • ७. फक्त शिवसेना लढली तर काय होईल?
  • ८. मतदारसंघ शिवसेनेस अनुकुल नसल्यास, आघाडीत कोणत्या पक्षास द्यावा, उमेदवार कोण असू शकतो?
  • ९. बिएलए एजंटचे निवडणूक कार्यालयात रजिस्ट्रेशन झाले आहे का? निवडणूक आयोगाची ओळखपत्रे आपल्याकडे आहेत का? नसल्यास त्वरित करुन घ्यावे.
  • १०. लोकसभा निवडणूक २०२४ आपला अभिप्राय थोडक्यात ?

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा