उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच शिंदेचा मास्टरस्ट्रोक… विकासासाठी इतक्या कोटींचा निधी मंजूर… संजय देशमुख यांचे ठाकरेंना त्या पोस्टमधून थेट प्रत्युत्तर
Uddhav Thackeray - Eknath Shinde -Sanajay Deshmukh: उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा हाती घेतला आहे. आज वाशिम-यवतमाळ मतदारसंघात त्यांची तोफ धडाडली. त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी खेळली आहे.

Washim- Yavatmal Lok Sabha Substantial Funds: उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा सुरू केला आहे. त्यांची तोफ आज वाशिम-यवतमाळ मतदारसंघात धडाडली. त्यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. गद्दारांना धडा शिकवण्याचे आवाहन त्यांनी केले. तर त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी खेळी खेळली आहे. या दौऱ्यावर कोणतीही टीका न करताही खासदार संजय देशमुख यांची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी भरीव निधी मंजूर केला आहे.
9 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर
एकीकडे उद्धव ठाकरे यांचा फुटलेले आमदार संजय देशमुख यांच्या यवतमाळ वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात दौरा सुरू आहे. यवतमाळ येथे त्यांची तोफ धडाडली आहे. तर दुसरीकडे वाशिम-यवतमाळ मतदार संघातील विविध कामांसाठी नऊ कोटी चाळीस लाख रूपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. फुटलेल्या आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासामध्ये निधी मिळत नसल्यास कारण समोर देत ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावरून आज उद्धव ठाकरे यांनी देशमुखांवर टीका केली आहे. त्याचवेळी शिंदेंनी 9 कोटी 40 लाखांचा निधी मंजूर केला आहे.
खासदार संजय देशमुख यांची पोस्ट समोर
शिंदे शिवसेनेत प्रवेश करताच आठवड्याभराच्या आता वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी नऊ कोटी 40 लाख रुपयांचा या मतदारसंघातील विविध नगरपरिषदांसाठी निधी मंजूर करण्यात आल्याची पोस्ट संजय देशमुख यांनी केली आहे. हा निधी मंजूर केल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतच महायुती सरकारच्या आभार मानले आहे
यवतमाळ – दोन कोटी पाच लाख
वाशीम – एक कोटी 65 लाख
मंगरुळपीर -८० लाख
कारंजा – १ कोटी ५० लाख
कळंब –१ कोटी २० लाख
दिग्रस- १ कोटी ४५ लाख
राळेगाव- ७५ लाख
विकासनिधीवरून उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला
विकासनधीपासून काय आडलं. गाडगेबाबा आणि तुकडोजी महारांजांचं कुठल्या विकासनिधीपासून अडलं होतं. त्यांनी केलंही ना काम. लोकं गद्दारांना नमस्कार करण्याऐवजी तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांना नमस्कार करतात. तुकडोजी महाराजांनी भजनातून राष्ट्रभक्तीचं बीज रोवलं. विरोधकांकडे पैसा आहे. साधन संपत्ती आहे. आमच्याकडे जिवंत माणसे आहेत. महात्मा गांधी आणि टिळकही म्हटले असते विकास निधी मिळत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय देशमुख यांना लगावला होता.