AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! देवेंद्र फडणवीस गायब, सर्वात मोठी उलथापालथ भाजपमध्ये?; दैनिक ‘सामना’तील दावा काय?

ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीका करण्यात आली आहे. राज्यातील सर्वात मोठी घडामोड भाजपमध्ये घडत आहेत. अजित पवार यांच्या नावाने फक्त रेवड्या उठवल्या गेल्या आहेत, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

सर्वात मोठी बातमी ! देवेंद्र फडणवीस गायब, सर्वात मोठी उलथापालथ भाजपमध्ये?; दैनिक 'सामना'तील दावा काय?
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 19, 2023 | 1:09 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहेत. अजितदादा 40 आमदार घेऊन भाजपसोबत जाणार असल्याचं सांगितलं जात असल्याच्याही चर्चा होत्या. या चर्चांना खुद्द अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. याच मुद्द्यावरून दैनिक ‘सामना”च्या अग्रलेखातून हल्ला चढवण्यात आला आहे. शिंदे गट म्हणजे बिनकामाचे ओझे झाले आहे. त्यांना दूर करण्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू आहेत, असं सांगतानाच अजितदादा यांच्याबाबत वावड्या आणि रेवड्या उडवण्यात आल्या. पण अजितदादांनीच त्याला पूर्णविराम दिल्याचं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. तसेच राज्यातील सर्वात मोठी उलथापालथ भाजपमध्येच सुरू असल्याचा दावाही अग्रलेखातून करणअयात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सध्या वावड्या आणि रेवड्या उडवण्यात आघाडीवर आहे. अजित पवार यांच्याबाबतही अशाच वावड्या उडवल्या. ते भाजपसोबत जाणार आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे, अशा वावड्या उडवण्यात आल्या. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघणार असल्याच्याही चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली असून त्यांच्याकडे 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र असल्याचंही माध्यमांवर सांगण्यात आलं. पण अजितदादांनी या चर्चांना तिलांजली दिली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे, असं दैनिक ‘सामना’तील अग्रलेखात म्हटलं आहे.

बावनकुळे आणि शेलार वेलदोडे

वावड्या उठवणाऱ्यांनी राजकीय भान ठेवायला हवे, असा सल्लाही सामनातून देण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गंमतीशीर गृहस्थ आहेत. त्यांच्या विधानाकडे निव्वळ गंमत म्हणून बघावे लागते. महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले. ते दोन नेते कोण तर बावनकुळे आणि आशिष शेलार. म्हणजे अजित पवारांसारख्या बलदंड नेता 40 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतोय. त्याबाबत चर्चा करायला दिल्लीत कोण जात आहेत तर हे दोन वेलदोडे. तेव्हा कोणत्या वावड्या किती गंभीर्याने घ्यायच्या? असा खोचक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

शिंदे गट बिनकामाचे ओझे

सध्याच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाविकास आघाडीचे सरकार गेले. आता भाजपसाठी शिंदे गट हा बिनकामाचे ओझे झाला आहे. हे ओझे कसे फेकता येईल यावर महाराष्ट्र आणि दिल्लीत चर्चा सुरू आहे. आश्चर्य म्हणजे कालचे बाहुबली देवेंद्र फडणवीस हे राज्यातील या सगळ्या उपक्रमातून बेपत्ता आहेत. त्यामुळे राज्यात भाजपातच सर्वात मोठी उलथापालथ सुरू आहे की काय? अशी शंका घ्यायला जागा आहे, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे. कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी फोडून स्वत:चे घर भरायचे काम सुरू आहे. भाजपची काँग्रेसवरही वाईट नजर आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या वावड्या आणि रेवड्या उठवून वातावरण गढूळ करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पण अजितदादांनी हे कारस्थान उधळून लावले आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.