AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रिकामं भांडं जास्त आवाज करतं’, ठाकरे सेनेच्या शिलेदाराचा नितेश राणे यांना झणझणीत टोला, म्हणाले…

Akhil Chitre criticized Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे सेना आणि मंत्री नितेश राणे यांच्यात शा‍ब्दिक वाद झडत असतानाच आता उद्धव गटाच्या शिलेदाराने राणेंविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी मच्छिमारांच्या प्रश्नावरून अचूक निशाणा साधला आहे.

'रिकामं भांडं जास्त आवाज करतं', ठाकरे सेनेच्या शिलेदाराचा नितेश राणे यांना झणझणीत टोला, म्हणाले...
नितेश राणे, उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 29, 2026 | 8:00 AM
Share

दिशा सालियन प्रकरणावरून उद्धव सेना आणि मंत्री नितेश राणे आमने-सामने आले आहेत. खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाला हवा देण्याचे आणि फंडिंग पुरवण्याचा राणे कुटुंबियांवर आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शा‍ब्दिक वाद झडत आहे. त्यातच उद्धव सेनेचे नेते अखिल चित्रे यांनी आता मंत्री नितेश राणे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. मच्छिमारांच्या नुकसानी भरपाईवरून त्यांनी मंत्रिमहोदयांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राणे हे त्यांच्या खात्याचे काम सोडून इतर मुद्दात गुरफटल्याचा आरोप चित्रे यांनी केला आहे.

ठाकरेंच्या नावाने प्रसिद्धी मिळवण्याचा स्वस्त प्रकार

अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांच्यावर जहरी टीका केली आहे. ठाकरेंच्या नावाने प्रसिद्धी मिळवण्याचा हा स्वस्त प्रकार आता बंद करा. तुम्ही मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री आहात, मग तुमच्या खात्याचं काम बोला. राज्यातील शेतकरी आणि मच्छीमार संकटात आहेत आणि तुम्ही मात्र बांगलादेशी, नेपाळी, पाकिस्तानी करत राजकीय पोपटपंची करण्यात व्यस्त आहात. तिथेही त्यांचं ज्ञान कमीच आहे. मच्छीमारांचं नुकसान किती? किती पंचनामे झाले? किती मदत दिली? किती जणांच्या खात्यात पैसे जमा झाले? “दुप्पट मदत” म्हणत असाल तर आकडे जाहीर करा आणि हिशोब द्या, असे चित्रे यांनी सुनावले आहे.

रिकामं भांडं जास्त वाजतं

इंग्रजीत एक म्हण आहे, “Empty vessels make the most noise.” मराठीत सांगायचं तर, “रिकामं भांडं जास्त आवाज करतं.” अशी खरमरीत टीकाही चित्रे यांनी राणे यांच्यावर केली. ठाकरेंच्या नावाचा जप करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा हिम्मत असेल तर स्वत:च्या कामाचा आवाज महाराष्ट्राला ऐकवा, असा सल्लाही चित्रे द्यायला विसरले नाहीत.

नितेश राणे यांचे मच्छिमारांसाठी घोषणा

१. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदेर विकास मंत्री नितेश राणे यांनी मच्छिमारांच्या नुकसान भरपाई आणि सवलतीबाबत काही घोषणा केल्या होत्या.

२. त्यानुसार राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमधील मच्छिमार, मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना शासनाकडून विशेष मदत दिली जाणार आहे.

३. धरण, तलाव क्षेत्रात पाणी टंचाईमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून प्रभावित मच्छिमारांना मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

४. माशांच्या प्रजनन काळात मासेमारी पूर्णपणे बंद असते. या काळात मच्छिमारांचे नुकसान होते. त्यांच्यासाठी आंध्र प्रदेश राज्याच्या धरतीवर राज्यातील शेतकऱ्यांना 20 ते 22 हजारांची मदत देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

५. मच्छिमार व्यवसायाला राज्य सरकारने अगोदरच शेतीचा दर्जा दिला आहे. शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे कर्जमाफी आणि विविध योजनांचे लाभ दिले जातात. त्याच धरतीवर मच्छिमारांनाही कर्जमाफी आणि विशेष सवलती देण्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. पण चित्रे यांनी मदतीच्या आकडेवारीसह माहिती देण्याचे आवाहन राणे यांना केले आहे.

Follow Us
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र