AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray:  राज्यसभेच्या जागेवरून खडाजंगी? प्रियंका चतुर्वेदी संतापल्या का? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत घडलं काय?

Uddhav Thackeray Shivsena MP Meeting: 'ऑपरेशन टायगर' होण्याच्या चर्चेनंतर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांची काल बैठक झाली. या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून चांगलीच खडाजंगी झाल्याचे कळते. प्रियंका चतुर्वेदी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तर आदित्य ठाकरे हे सुद्धा खासदारांच्या त्या मागणीवर नाराज झाल्याचे कळते.

Uddhav Thackeray:  राज्यसभेच्या जागेवरून खडाजंगी? प्रियंका चतुर्वेदी संतापल्या का? उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत घडलं काय?
उद्धव ठाकरे शिवसेना खासदार बैठकImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 26, 2026 | 10:28 AM
Share

Uddhav Thackeray Shivsena MP Meeting:‘ऑपेरशन टायगर’ राबवले जाणार असल्याच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. काल झालेल्या या बैठकीत राज्यसभेची हक्काची जागा हातून गेल्यावरून खडाजंगी झाल्याचे समजते. नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला. शरद पवार यांना पाठिंबा दिल्याने राज्यसभेतील शिवसेनेची हक्काची जाग गेली असा सूर आळवल्या गेला. तर इतर खासदारांनी केलेल्या त्या मागणीमुळे आदित्य ठाकरेही नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रियंका चतुर्वेदी संतापल्या

उद्धव ठाकरे यांनी काल खासदारांची बैठक बोलावली होती. त्यात उद्धव सेनेच्या खासदारांनी हजेरी लावली. या बैठकीची इनसाईड स्टोरी समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार यांच्यासाठी शिवसेनेची हक्काची खासदारकीची जागा सुटल्याने प्रियंका चतुर्वेदी संतापल्याचे समजते. संजय राऊतांनी पवारांचं नाव का घेतलं? असा सवाल चतुर्वेदींनी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी खर्गे आणि रमेश चेन्नीथला यांना फोन केल्याचे समजते. आमच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका. काँग्रेसने शरद पवार यांच्याशी थेट बोलावे असे कान त्यांनी टोचले.  तर पक्ष प्रमुख मी आहे. राऊत  काही बोलले तरी शेवटी निर्णय मीच घेणार होतो असे उद्धव ठाकरे यांनी सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर बैठकीनंतर एका खासदारानं चतुर्वेदींना 6 वर्षे संधी देऊन काय उपयोग झाला असा सवालही उद्धव ठाकरेंना केल्याचे समजते.

खासदारांवर व्यक्त केला विश्वास

तर ऑपरेसन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी खासदारांवर विश्वास व्यक्त केला. भाजप आणि राष्ट्रवादीचे लोक सांगतात की तुमचे खासदार फुटणार आहेत. पण माझा तुमच्यावर विश्वास आहे. सर्व लढाई तुमच्या भरवशावर आहे असे उद्धव ठाकरे म्हणाल्याचे कळते. या बैठकीला आदित्य ठाकरे हे पण उपस्थित होते. त्यांनी खासदारांशी संवाद साधला नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबई बाहेर महाराष्ट्रातही दौरे करावेत अशी मागणी काही खासदारांनी केल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?