AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: म्हणून आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो… उद्धव ठाकरेंनी सांगितलं युतीचं कारण? नेमकं काय म्हणाले

Uddhav Thackeray: विरोधकांच्या सत्याच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केली. या भाषणामध्ये त्यांनी आम्ही दोघं भाऊ एकत्र का आलो याविषयी देखील वक्तव्य केले. तसेच त्यांनी निवडणूक आयोगा विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचे देखील म्हटले आहे.

Uddhav Thackeray: म्हणून आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो... उद्धव ठाकरेंनी सांगितलं युतीचं कारण? नेमकं काय म्हणाले
uddhav-thackerayImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 01, 2025 | 3:53 PM
Share

MNS MVA Mumbai Protest : मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चाला राज्यातून अनेक ठिकाणीहून लोक आले. हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चाला उपस्थित आहेत. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि इतर काही नेते उपस्थित आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी सभेत भाषण करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीबाबात वक्तव्य केले आहे.

आम्ही दोघे एकत्र आलो कारण…

उद्धव ठाकरे सभेत म्हणाले की, आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. तुमच्यासाठी आलो आहोत. मराठी माणसासाठी. हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत. आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे. साथ देण्याची धमक असेल तर हाताची मूठ वळवून दाखवा. हा फोटो मतचोराच्या बादशाहकडे पाठवा. मतचोरी केली तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही.

निवडणूक आयोगाविरोधात उचलणार मोठं पाऊस

तसेच या सभेत त्यांनी निवडणूक आयोगा विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचे देखील म्हटले. चोर दिसेल त्याला तिथेच फटकवा. लोकशाही मार्गाने फटकवा. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. अॅनाकोंडा बसला आहे. मी मागेही आवाहन केल होतं. निवडणूक येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही कायदेशीर मार्ग अवलंबत आहोत. येत्या काही दिवसात आपण न्यायालयात जाणार आहोत. न्यायालयाकडून न्याय मिळतो की नाही पाहू. आम्हाला आता न्याय पाहिजे. सर्व पुरावे दिल्यानंतर. त्या न्यायालयात न्याय मिळेल याची खात्री आहे. नाही तर जनतेचं न्यायालय निर्णय घ्यायला तयार आहे. असे ते म्हणाले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.