AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन?

Local Government Elections : मिनी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गट आताच मैदानात उतरला आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थेत विधानसभेचा पराभव धुवून काढण्याची तयारी करण्यात येत आहे.

Udhav Thackeray : मिनी विधानसभेसाठी ठाकरे गट आताच मैदानात; शिवसेना भवनाच्या बैठक, काय ठरला मास्टरप्लॅन?
Udhav Thackeray Local Body ElectionImage Credit source: गुगल
| Updated on: May 18, 2025 | 12:07 PM
Share

मिनी विधानसभेसाठी उद्धव ठाकरे गटा आताच मैदानात उतरला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काल शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणत्या वॉर्डात ताकद?

जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदार संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेत्यांच्या दौर्‍याच्या माध्यमातून स्थानिक जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांच्या सहकार्याने स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकण्यासाठी ठाकरे गटाकडून जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे.

ज्या नेत्यांना ज्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय माहिती घेण्याचे आदेश शिवसेना भवन येथून देण्यात आले आहेत. राज्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे का? याची माहिती तसेच 2012 आणि 2017 च्या महापालिकेच्या मतदार संघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

10 जणांची टीम करणार तयारी

शहरामध्ये शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, प्रभागप्रमुख, 2 वार्डसाठी उपविभागप्रमुख आणि प्रत्येक वॉर्डसाठी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे तर ग्रामीण भागात तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, गावपातळीवर शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. या संघटनात्मक रचना पूर्ण करून यादीचा अहवाल आणि आपल्या स्थानिक भागातील कोणते वार्ड अथवा मतदार संघ लढवणे आवश्यक आहे याची माहिती 19 जूनपर्यत शिवसेना भवनात जमा करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील महानगर पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यावर दिलेली जबाबदारी अशी आहे.

1. ठाणे, नवी मुंबई, मीरा भायंदर – सुभाष देसाई, राजन विचारे

2. पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर- संजय राऊत

3. धुळे, अहिल्यानगर – अनिल परब, संजय राऊत

4. कल्याण – डोंबिवली – अनिल परब

5. उल्हासनगर, पनवेल शहर – अनंत गिते

6. अमरावती, अकोला – अरविंद सावंत

7. नागपूर, चंद्रपूर – भास्कर जाधव

8. वसई – विरार शहर, भिवंडी निजामपूर शहर – विनायक राऊत

9. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे

10. लातूर, सोलापूर – चंद्रकांत खैरे

11. परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर – अंबादास दानवे

12. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाड – सुनील प्रभू

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.