लसीकरणाचा डेटा सार्वजनिक करु नका; केंद्राच्या आदेशावर नवाब मलिक म्हणतात

किती लस आली, किती लोकांना लसीकरण करण्यात आले याची माहिती स्वतः केंद्र सरकारने दर आठवड्याला जाहीर करावी. कुठल्या राज्याला किती लस दिली हे सांगावे. | Vaccination in Maharashtra

लसीकरणाचा डेटा सार्वजनिक करु नका; केंद्राच्या आदेशावर नवाब मलिक म्हणतात
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: केंद्र सरकार कोरोना लसीकरणाबाबतचा माहितीचा डाटा सार्वजनिक करु नका असे राज्यांना सांगत आहे. मात्र किती लस आम्हाला दिली आणि किती लसीकरण (Vaccination) केले हे लोकांना सांगणे गरजेचे आहे. ही माहिती लोकांपासून का लपवायची, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. (NCP Leader Nawab Malik on Modi govt vaccination policy)

किती लस आली, किती लोकांना लसीकरण करण्यात आले याची माहिती स्वतः केंद्र सरकारने दर आठवड्याला जाहीर करावी. कुठल्या राज्याला किती लस दिली हे सांगावे. किती लसीकरण केले याची पारदर्शकपणे माहिती द्यावी. माहिती लपवून कोरोनाला हरवू शकत नाही, असेही नवाब मलिक यांनी म्हटले.

केंद्र सरकारने 12 कोटी लस पुरवठा जूनपर्यंत देण्याची घोषणा केली होती. दहा दिवस उलटून अकरावा दिवस उजाडला तरी केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. केंद्र सरकार फक्त घोषणा करते त्यावर अंमलबजावणी होत नाही. लस उपलब्ध करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. हे लपवण्यासाठी लसीकरणाचा डाटा सार्वजनिक करु नका. यामुळे मार्केटिंग कंपन्यांना फायदा होईल असे सांगत आहे. मात्र, हा दावा तथ्यहिन असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

गेल्या 24 देशात कोरोनाचे 91,702 नवे रुग्ण; मृतांचा आकडाही वाढला

देशात गेल्या 24 तासांत 91,702 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3403 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचे (Coronavirus) प्रमाण घटत होते. हा आकडा अगदी 60 हजारापर्यंत खाली गेला होता. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे.

आता नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा एकदा 90 हजाराच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे अजूनही देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याचे दिसत आहे. मात्र, समाधानाची बाब इतकीच की देशात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 1,34,580 इतकी आहे.

‘व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो नकोच’

व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काँग्रसने आक्षेप घेतला आहे. व्हॅक्सिनेशन फोटोवर पंतप्रधानांचा फोटो नसावा. आमचा त्याला विरोध आहे, असं काँग्रेसने स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदींच्या फोटोला आक्षेप असल्याचं म्हटलं आहे. केरळ आणि छत्तीसगडमध्ये व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा फोटो नसावा. आमचा या फोटोला आक्षेप आहे, असे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

कोरोनानंतर देशात नव्या खतरनाक व्हायरसची एण्ट्री? पहिला रुग्ण आढळल्याचा दावा

भारतात किती लसीकरण झालयं? कुणाला किती लसीचे डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सविस्तर माहिती

(NCP Leader Nawab Malik on Modi govt vaccination policy)