AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Good News : राज्यात आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, १६ डब्यांची एक्स्प्रेस धावली सुसाट

Vande Bharat Express : रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली बातमी आहे. राज्यात आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. राज्याला चौथी वंदे भारत मिळणार असून मंगळवारी तिची ट्रयल रन यशस्वी झाली. सर्वात अवघड मार्गावर गाडी सुसाट धावली.

Good News : राज्यात आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार, १६ डब्यांची एक्स्प्रेस धावली सुसाट
Vande_Bharat_ExpressImage Credit source: socialmedia
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 16, 2023 | 11:30 AM
Share

रत्नागिरी : भारतीय रेल्वेचा विस्तार गेल्या काही वर्षांत वेगाने सुरु आहे. भारतीय रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस देशभरात अनेक मार्गावरुन धावू लागली आहे. या गाडीची लोकप्रियता वाढत आहे. यामुळे अनेक ठिकाणी ती सुरु करण्याची मागणी होत आहे. आता राज्याला लवकरच आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. मुंबई- गांधीनगर दरम्यान पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. त्यानंतर मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस धावू लागली. तसेच मुंबईवरुन शिर्डीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली. आता चौथी गाडी लवकरच सुरु होणार आहे.

आता कोणत्या मार्गावर धावणार

कोकण रेल्वे मार्गावर आज वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन यशस्वी झाली. या मार्गावर १६ डब्यांची एक्स्प्रेस सुसाट धावली. ट्रायल रनसाठी कोकण रेल्वे मार्गावरील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑपरेटिंग, एस अँड टी सुपरवायझर अलर्ट मोडवर होते. ट्रायल रनसाठी मंगळवारी वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलमधून सुटली आहे, ही गाडी दुपारी २.३० ला मडगावात पोहचणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसला कोकण रेल्वे मार्गावर हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

मेक इन इंडिया ट्रेन

देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे. वंदेभारतच्या 75 रेकची निर्मिती पहिल्या टप्प्यात होणार असून त्यात जरी चेअरकारचे डबे असले तरी तिची आसने आता अधिक आरामदायी करण्यात आली आहेत.

देशात चार ठिकाणी निर्मिती

पहिली ‘वंदेभारत ट्रेन’ 2018 मध्ये तयार करण्यात आली होती. सध्या देशातील चार रेल्वे कारखान्यात ‘वंदे भारत’ ट्रेनची निर्मिती सुरू असून लातूर येथील नव्या कारखान्यातही तिचे सूटे भाग आणि डबे तयार करण्यात येणार आहे. वंदेभारत ही विनाइंजिनाची 16 डब्यांची ट्रेन असून तिच्या दर एका डब्यामागे एक मोटरकोचचा डबा जोडलेला आहे. त्यामुळे तिच्या पन्नास टक्के चाकांना मोटरची ताकद मिळते. तिचा कमाल वेग प्रति तास 160 कि.मी. इतका आहे. तिच्या मोटरसह सर्व इलेक्ट्रीक पार्ट्स डब्याच्या खालच्या भागात बसविलेले आहेत. ही ट्रेन सुरू होताच अवघ्या सात सेंकदात वेग पकडू शकते.

1128 प्रवासी क्षमता

या ट्रेनच्या मोटर असलेल्या कोचमध्येही प्रवासी सामावू शकतात. तसेच ही ट्रेन वीजेवर धावणारी असल्याने पॉवर जनरेटर कार जोडायची गरज राहत नाही. त्यामुळे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता शताब्दी पेक्षा जादा आहे. एकूण 1128 इतकी प्रवासी क्षमताआहे.

Follow Us
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी