VIDEO : गोमू तुझ्या संगतीनं 'युती'वर निर्णय होणार काय?

मुंबई : केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना आणि हे दोन्ही पक्ष गेल्या 25-30 वर्षांपासूनचे मित्रपक्ष असताना, दोन्ही पक्षातली खडाजंगी काही नवीन नाही. या-ना त्या कारणावरुन एकमेकांवर शरसंधान साधायला दोन्ही पक्षातील अगदी मोठ-मोठे नेते सुद्धा मागे-पुढे पाहत नाही. कधी सत्तेला लाथ मारण्याची भाषा होते, तर स्वबळाची. अनेकदा तर खिशातून राजीनामे फिरवत सत्ताभोग घेताना दिसतात. मात्र […]

VIDEO : गोमू तुझ्या संगतीनं 'युती'वर निर्णय होणार काय?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

मुंबई : केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता असताना आणि हे दोन्ही पक्ष गेल्या 25-30 वर्षांपासूनचे मित्रपक्ष असताना, दोन्ही पक्षातली खडाजंगी काही नवीन नाही. या-ना त्या कारणावरुन एकमेकांवर शरसंधान साधायला दोन्ही पक्षातील अगदी मोठ-मोठे नेते सुद्धा मागे-पुढे पाहत नाही. कधी सत्तेला लाथ मारण्याची भाषा होते, तर स्वबळाची. अनेकदा तर खिशातून राजीनामे फिरवत सत्ताभोग घेताना दिसतात. मात्र म्हणतात ना, ‘तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना’. असंच काहीसं सेना-भाजप युतीचं आहे. हेच नेमकं एका व्हिडओतून अत्यंत खुमासदार पद्धतीने मांडलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फेसबुकवरील ‘पुण्याचा सरपंच’ या पेजवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘युतिया साँग’ असे या व्हिडीओला नाव देण्यात आले आहे. सुधीर मोघे लिखित आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या ‘गोमू तुझ्या संगतीनं…’ या गाण्याचा वापर करत, पात्रांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चेहरे जोडून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. गाण्याचा नेमका वापर करुन शिवसेना-भाजप युतीचे अंतर्गत कलह विडंबन करत खुमासदार पद्धतीने मांडले आहेत. शिवसेना-भाजपच्या युतीतल्या नात्यावर नेमके भाष्य करणारे हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘गोमू तुझ्या संगतीनं…’ गीतकार सुधीर मोघे यांनी ‘गोमू तुझ्या संगतीनं..’ हे गीत लिहिले असून, संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केले आहे. मूळ गाणं आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलं होतं. ‘हा खेळ सावल्यांचा’ या 1976 साली दिग्दर्शित झालेल्या प्रसिद्ध सिनेमातील हे गाणं आहे. पाहा व्हिडीओ : https://www.facebook.com/punyachaSarpanch/videos/290705284909054/

Non Stop LIVE Update
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका
ते टरबूज उन्हाळ्यात तरी कामी येतं, पण हे ..., ठाकरेंची फडणवीसांवर टीका.