लालबाग राजा गणपतीचा 1934 पासून 2024 पर्यंतची मूर्ती असणारा व्हिडिओ व्हायरल

lalbaugcha raja: लालबागच्या राजाची स्थापना १९३४ मध्ये करण्यात आली. त्या ठिकाणी असलेला बाजार कायम राहावा त्यासाठी त्या ठिकाणी असलेला कोळी व इतर व्यापाऱ्यांनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती झाली. त्यानंतर लालबागचा राजा गणपतीची कीर्ती सर्वत्र होऊ लागली.

लालबाग राजा गणपतीचा 1934 पासून 2024 पर्यंतची मूर्ती असणारा व्हिडिओ व्हायरल
lalbaugcha raja
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 7:53 AM

गणेशोत्सवाची धामधूम गेल्या दहा दिवसांपासून सुरु होती. आता पुढच्या वर्षी लवकर या…च्या गजरात गणरायाचे विसर्जन झाले. पुणे, मुंबईतील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातील भाविकांची गर्दी झाली. मानाचे गणपती आणि प्रसिद्ध गणपती पाहण्यासाठी तासनतास रांग लावून भाविक थांबले होते. मुंबईतील लालबागच्या राजाचे आकर्षण मुंबईकरांनाच नाही तर राज्यातील सर्व भाविकांना होते. अनेक दिग्गज अन् सेलिब्रिटी लालबाग राजाचे दर्शन घेतात. त्याचवेळी लालबागच्या राजाच्या गणपतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओत गणपतीच्या स्थापनेपासून 2024 पर्यंत असणाऱ्या सर्व मूर्ती दाखवण्यात आल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

असा आहे इतिहास

लालबागच्या राजाची स्थापना १९३४ मध्ये करण्यात आली. त्या ठिकाणी असलेला बाजार कायम राहावा त्यासाठी त्या ठिकाणी असलेला कोळी व इतर व्यापाऱ्यांनी नवस केला होता. त्यांची इच्छापूर्ती झाली. त्यानंतर लालबागचा राजा गणपतीची कीर्ती सर्वत्र होऊ लागली. नवसाला पावणारा हा गणपती आहे, अशी प्रसिद्धी झाली. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही.बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु.ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यानंतर १९३४ मध्ये ‘श्री’ची स्थापना झाली.

हे सुद्धा वाचा

लालबागच्या राजाचे मंडळ गणरायाच्या मूर्तीस निरनिराळया नेत्यांची रुपे दिली होती. १९४६ साली गणरायाची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेषात दाखवण्यात आली. १९४७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या वेषात श्रीची मूर्ती होती. १९४८ महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत मूर्तीचे रूप साकारले होते.

मूर्तीसाठी अशी होते तयारी

लालबागच्या राजाची मूर्ती मुंबईत सर्वात उंच मूर्ती असते. शेकडो मूर्तीकार ही मूर्ती तयार करतात. मूर्तीकार गणरायाचे वेगवेगळे भाग तयार करतात. त्यानंतर ते जोडले जातात. मूर्ती जोडण्यापूर्वी एक विशेष पूजा केली जाते. गणपतीच्या पायाची ही पूजा असते. गणपती मंडळाचे सदस्य आणि मूर्तीकार या पूजेत सहभागी होतात. पूजा झाल्यावर मूर्तीला रंगकाम केले जाते. त्यानंतर सजावट केली जाते. राजाचे मांडव सजवण्याची जबाबदारी मोठ्या आर्ट डायरेक्टवर सोपवली जाते.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.