AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan parishad election : विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या ”घोडेबाजारा”ची शक्यता, एका मतासाठी 50 लाख देणार?

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मतांवर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या घोडेबाजाराची शक्यता आहे. एका-एका मतासाठी 50 लाखांची बोली लागण्याची शक्यता आहे.भाजप आणि शिवसेनेत दोघात 'तिसरा' आल्यानं निवडणूक रंगत होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.

Vidhan parishad election : विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या ''घोडेबाजारा''ची शक्यता,  एका मतासाठी 50 लाख देणार?
bmc
| Edited By: | Updated on: Nov 25, 2021 | 1:59 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या मतांवर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या घोडेबाजाराची शक्यता आहे. एका-एका मतासाठी 50 लाखांची बोली लागण्याची शक्यता आहे.भाजप आणि शिवसेनेत दोघात ‘तिसरा’ आल्यानं निवडणूक रंगत होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा विजय स्पष्ट दिवसत असताना काँग्रेस नेते सुरेश कोपरकरांनी अपक्ष अर्ज दाखल झाल्यानं चित्र बदललं आहे. ऐनवेळी कोपरकर अर्ज मागे घेण्याचीही शक्यता आहे.

एका-एका मतासाठी 50 लाख बोली?

शिवसनेकडून वरळीतील जागा आदीत्य ठाकरेंसाठी सोडणाऱ्या सुनील शिंदेंना मैदानात उतरवण्यात आलं आहे. तर भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी देण्यात आलीय. अपक्ष म्हणून अचानक सुरेश कोपरकर रिंगणात उतरले आहेत. निवडणूक रंगत झाली असतानाच नेत्यांकडून अनेकजण संपर्कात असल्याचे दावे केले जात आहेत. भाजप उमेदवार राजहंस सिंह आणि पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विरोधकांचे अनेक नगरसेवक संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.

सुनील शिंदेंचा विजय निश्चित

288 नगरसेवकांपैकी शिवसेनेकडे 99 नगरसेवकांचं समर्थन असल्यानं सेनेचं पारडं जड आहे. शिवसेना उमेदवार सुनील शिंदेंचा विजय निश्चित आहे. शिवसेनेकडेडील उरलेली 18 मतं कोपरकरांना पडू शकतात.  तर भाजपकडेही 83 नगरसेवकांचं समर्थन आहे त्यामुळे राजहंस सिंह यांचाही विजय निश्चित आहे.

दोघांत  तिसरा आल्यानं मतांची फोडाफोडी

इतर पक्षांचे मिळून फक्त 47 नगरसेवक आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांनी विजयसाठी 77 मतांची गरज असणार आहे. त्यामुळे सेनेची 18 मतं मिळूनही कोपरकरांचं संख्याबळ कमी पडतंय.  ऐनवेळी तिसऱ्या उमेदवारांची एन्ट्री झाल्यानं पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. एका नगरसेवकासाठी 50 लाखांची बोली लावली जाऊ शकते अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

Nagpur चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगणे भोवले

‘फरार’ परमबीर सिंग अखेर मुंबईत

Marathi Movie | प्रेमाची अनोखी केमिस्ट्री, यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाई म्हणणार ‘वन फोर थ्री’!

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.