AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidhan Parishad Election : फडणवीस आम्हाला मत देतील, ते आमच्या संपर्कात, बच्चू कडू यांचा खोचक टोला

शिवसेनेच्या बैठकीनंतर बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अशीच एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या संपर्कात आहे, ते आम्हालाच मतदान करतील असा विश्वास आम्हाला आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Vidhan Parishad Election : फडणवीस आम्हाला मत देतील, ते आमच्या संपर्कात, बच्चू कडू यांचा खोचक टोला
फडणवीस आम्हाला मत देतील, ते आमच्या संपर्कात, बच्चू कडू यांचा खोचक टोलाImage Credit source: tv9
| Updated on: Jun 18, 2022 | 5:32 PM
Share

मुंबई : निवडणुकीच्या काळात सर्वात जास्त ऐकायला मिळणारं वाक्य म्हणजे…ते आमच्या संपर्कात आहेत…आमचा संवाद सुरू आहे…विजय आमचाच होणार…आता विधान परिषदेच्या निवडणुकीतलं (Vidhan Parishad Election) चित्रही असेच काहीसं आहे. सर्वच राजकीय पक्ष अपक्ष आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्व उमेदवरांच्या विजयाचा दावा करत आहेत. मात्र तसं होणार नाही हेही सर्वांना महिती आहे. कारण विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आता 11 उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे एकाचा पत्त कट होणार हे निश्चित आहे. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. आज मुंबई, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांच्या आपआपल्या गोटात बैठका सुरू पार पडत आहेत. शिवसेनेच्या बैठकीनंतर बोलताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी अशीच एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या संपर्कात आहे, ते आम्हालाच मतदान करतील असा विश्वास आम्हाला आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

आज शिवसेनेच्या आमदरांनी मतदान कसे करावे याबाबत रंगीत तालीम पार पडलीय. याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, आज मतदान कसे करावे याबाबत ट्रायल होती. एकदा चुकलो म्हणून परत चुकू नये यासाठी काळजी घेतोय. मुख्यमंत्री आमच्याशी हितगुज करणार आहेत.तर भाजप नेते अपक्ष आपल्या संपर्कात असल्याचा दावा करत आहे असे विचारल्यावर बच्चू कडू म्हणाले, आम्ही पण संपर्कात आहोत की देवेंद्रजी आम्हाला कसं मत देतील, तसेच मला पूर्ण विश्वास आहे की देवेंद्रजी आम्हाला मत देतील, असा टोला त्यांनी लगावला आहे.

भाजपचा विजयाचा दावा

विधानपरिषदेच्या पाचही जागा भाजपा जिंकेल असा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केला आहे. महाविकास आघाडी मध्ये असंतोष आहे .आमदारांची कामे होत नाहीत, महाराष्ट्राचा विकास खुंटला आहे. येत्या विधान परिषद निवडणुकीत आमदारांचा असंतोष बाहेर येईल आणि 5 वी जागा भाजपा जिंकेल असा दावाही कराड यांनी केला आहे . आज कराड उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत कराड यांनी हा दावा केला आहे. दरम्यान पंकजा मुंडे माझ्या नेत्या आहेत असं सांगत कराड यांनी पंकजा मुंडे यांच्या नाराजी विषयी बोलणे टाळले आहे. आता कराडांचा दावा किती खरा ठरतो हे तर विधान परिषदेत्या निवडणुकीचे निकालच सांगतली.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.