AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : डुप्लिकेट चावी मिळवली, चोरीचाही कट… मध्येच वॉचमनचा जीव का घेतला? तिसरा कोण?

मुंबईतील विलेपार्ले येथे वॉचमन मोहन यादव यांच्या हत्येचा छडा लागला असून, जुहू पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. व्यावसायिकाच्या घरी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली होती. व्यावसायिकाचा स्वयंपाकी जोगेश्वर मल्लिक हाच कटाचा सूत्रधार असून, त्याने वॉचमनला दारू पाजून गळा आवळून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime : डुप्लिकेट चावी मिळवली, चोरीचाही कट... मध्येच वॉचमनचा जीव का घेतला? तिसरा कोण?
मुंबई क्राईम
| Updated on: Aug 08, 2026 | 10:33 AM
Share

विलेपार्ले पश्चिम परिसरातील अभिजित रेसिडेन्शियल इमारतीतील वॉचमन मोहन यादव यांच्या हत्या ( Mumbai Crime) प्रकरणाने प्रचंड खळबळ माजली होती. मात्र आता जुहू पोलिसांनी या हत्येचा छडा लावला असून, या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. व्यावसायिकाच्या कुटुंबाला लुटून त्यांची हत्या करण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.  या कटामागे व्यावसायिकाकडे स्वयंपाकी म्हणून काम करणारा जोगेश्वर मल्लिक हा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मल्लिकने संबंधित व्यावसायिकाच्या फ्लॅटची डुप्लिकेट चावी मिळवली होती. या चावीच्या आधारे फ्लॅटमध्ये प्रवेश करून चोरी करण्याचा कट त्याने तब्बल अडीच वर्षांपासून आखला होता, असा पोलिसांचा आरोप आहे.

या कटासाठी मल्लिकने विजय गोंजारे याच्यासह आणखी तिघांना सहभागी करून घेतले. सर्व आरोपींनी मिळून व्यावसायिकाच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याची योजना आखल्याचे तपासात उघड झालं आहे.

दारू पाजली, गळा आवळून काढला वॉचमनचा काटा

दरम्यान, 1ऑगस्ट रोजी आरोपी हे अभिजित रेसिडेन्शियल इमारतीत पोहोचले. त्यावेळीत्यांनी इमारतीचे वॉचमन मोहन यादव यांना दारू पाजली. त्यानंतर त्यांचा गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने यादव यांचा मृतदेह इमारतीतील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झाले. वॉचमनची हत्या केल्यानंतर आरोपींनी व्यावसायिकाच्या फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

या घटनेनंतर जुहू पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत मल्लिकच्या भूमिकेसह संपूर्ण कटाचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आरोपींनी आधीपासूनच चोरीची योजना आखली होती का, डुप्लिकेट चावी कशी मिळवण्यात आली आणि या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

विलेपार्ले परिसरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, एका चोरीच्या कटासाठी इमारतीतील वॉचमनची हत्या करण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

Follow Us
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणी
वारंवार फुटीर खासदार पंतप्रधानांच्या भेटला का जातात? कोर्टातील सुनावणींचा उल्लेख करत संजय राऊतांनी सांगितलं गुपित
पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय घडामोडींना वेग
Amit Shah Mumbai Visit | पुण्यानंतर आता अमित शाह मुंबईत! राजकीय आढाव्यासह दोन महत्त्वाचे कार्यक्रम, राजकीय घडामोडींना वेग
मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने...
मोठी बातमी! मोबाईल घेतलाय EMI वर? हप्ता थकवला तर सावधान! RBI च्या नव्या नियमाने वाढली चिंता, नेमकं काय होणार?
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...