विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कृष्णकुंजवर, राज ठाकरेंशी अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा

विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. (Vishva Hindu Parishad leaders Meet Raj Thackeray)

विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी कृष्णकुंजवर, राज ठाकरेंशी अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा
विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची नुकतीच घोषणा झाली. या घोषणेनंतर विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईतील कृष्णकुंज या ठिकाणी ही भेट झाली. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर निर्माण कार्यसंदर्भात विश्वहिंदू परिषद कोकण प्रांततर्फे वेगवेगळ्या स्तरावर नामांकित सन्माननीय व्यक्तींच्या भेट घेणे सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. (Vishva Hindu Parishad leaders Meet Raj Thackeray)

Vishva Hindu Parishad leaders Raj Thackeray 3

विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

“विश्व हिंदू परिषद आणि संघाकडून राज ठाकरेंना मदत मिळेल”

“अयोध्या तीर्थक्षेत्र न्यासतर्फे निधी संकलन अभियान सुरू आहे. त्यासाठी आम्ही राज ठाकरे यांच्याकडे माहिती देण्यासाठी आलो होतो. यात त्यांचं सहकार्य मिळावा यासाठी ही भेट होती,” अशी प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषदेचे नेते मोहन सालेकर यांनी दिली.

“अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी मदत निधी जमा केला जात आहे. येत्या मार्चमध्ये राज ठाकरे अयोध्येत जाणार आहे. त्यावेळी राज ठाकरेंकडून कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांना हा निधी देण्यात येणार आहे,” असेही मोहन सालेकर म्हणाले.

“हिंदुत्वाची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. ती अत्यंत महत्त्वाची आहे. राज ठाकरे यांचे नियोजन कसे करायचे,  हा त्यांचा अधिकार आहे. पण आम्हाला विचारल्यास विश्व हिंदू परिषद आणि संघाकडून त्यांना नक्कीच मदत मिळेल,” असेही मोहन सालेकर यांनी सांगितले.

Vishva Hindu Parishad leaders Raj Thackeray 1

विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

“राज ठाकरेंना मदत करायला सगळेच तयार” 

“विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. तसेच राज ठाकरेंनीही त्यांच्याशी बातचीत केली, अशी चांगली देवाण घेवाण झाली. सगळेच राज ठाकरे यांना मदत करायला तयार आहेत. राज ठाकरेंचं मोहन भागवत यांच्यासोबतही चांगलं नातं आहे,” अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.

“राज ठाकरे येत्या 1 ते 9 मार्चदरम्यान अयोध्या दोरा करणार आहेत. त्यानंतर राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरु होईल. प्रत्येक हिंदूने अयोध्येत जायला हवं. देवेंद्र फडणवीस देखील रामाला मानतात म्हणून तेही जातात,” असेही बाळा नांदगावकर म्हणाले.

“शिवसेना खासदार संजय राऊत यांना असं वाटतं की, शिवसेनेने सर्व काम केली आहेत. पण अयोध्येत गेल्यावर त्यांनी तिथे नक्की काय काम केलं हे समोर येईल,” असा टोलाही नांदगावकरांनी लगावला.

Vishva Hindu Parishad leaders Raj Thackeray

विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे. (Vishva Hindu Parishad leaders Meet Raj Thackeray)

संबंधित बातम्या : 

मनसेचा मेगाप्लॅन, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा ठरला, निवडणुकीसाठी रणनीती आखली

राज ठाकरे एका गोष्टीवर ठाम नसतात, सतत भूमिका बदलतात; अयोध्या दौऱ्यावरुन काँग्रेसचे टीकास्त्र

Published On - 3:15 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI