AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री आशिष शेलारांच्या शेजारच्या इमारतीत मतदार यादीत असा झोल, मनसेने बाहेर काढली धक्कादायक माहिती

"रंगशारदा सभागृहाजवळ गणेश मंदिर आहे. देवळात देव राहतो. जिथे देव राहतो तिथे बोगस मतदार रहायला ठेवलेले आहेत का? आता देवळाचा पत्ता देऊन तिथे पाच नाव टाकलेली आहेत. परप्रांतीय महापौर करायचा म्हणून जास्तीत जास्त परप्रांतीयांची नाव घुसवण्याचं काम भाजप करतोय का?"

मंत्री आशिष शेलारांच्या शेजारच्या इमारतीत मतदार यादीत असा झोल, मनसेने बाहेर काढली धक्कादायक माहिती
Sandeep Deshpande
| Updated on: Nov 10, 2025 | 12:06 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वांद्रे पश्चिमचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघातील मतदारयाद्यांचा घोळ बाहेर आणला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक खुलासे केले आहेत. आशिष शेलार दुसऱ्यांचे मतदारसंघ शोधून काढतात. आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी आशिष शेलारांची सवय आहे. त्यांच्या मतदारसंघात शोध घेतल्यानंतर मतदार यादीतील घोटाळे बाहेर आले. त्यातले तीन ते चार घोटाळे आपल्यासमोर मांडतोय. त्याची रीतसर तक्रार रिर्टनिंग ऑफिसरकडे करणार आहोत असं संदीप देशपांडे म्हणाले.

आशिष शेलार राहतात, त्याच्या बाजूला सारंग तरंग बिल्डिंग आहे. या सारंग तरंग बिल्डिंगमध्ये 1 ते 28 नंबर पर्यंत फ्लॅट आहेत. जिथे 1 ते 28 घर क्रमांक आहे, त्या इमारतीत दोन नाव आढळली. समुद्री बासू कलको या महिला असाव्यात, त्यांच्या पतीच नाव बासू कलको असावं. घर क्रमांक 455. ज्या इमारतीत 1 ते 28 फ्लॅट आहेत, तिथे 455 क्रमांकाचा फ्लॅट कुठून आला?. आमचे विभागअध्यक्ष तिथे राहतात. तिथे कुठलही 455 क्रमांकाच घर नाही. सोसायटीच्या सेक्रेटरीशी आम्ही बोललो. असा कुठला माणूस तिथे भाड्याने रहायला आला होता का? त्यांनी नाही असं सांगितलं. त्याचं सोसायटीत दुसरं नाव आहे, अनिताराज ऋतेश्वर. पतीच नाव ऋतेश्वर राजशेखरन शिवराज घर क्रमांक आहे 12/33 . हा कुठला क्रमांक आहे माहित नाही. या सारंग तरंग सोसायटीत कोणतीही व्यक्ती 15-30 वर्ष राहिलेलं नाही. मग यांचं नाव मतदार यादीत कसं आलं? याचं संशोधन निवडणूक आयोगाने करावं असं संदीप देशपांडे म्हणाले.

आशिष शेलारांनी झोपायचं काम केलं का?

किनारा बिल्डिंगमध्ये 1 ते 14 फ्लॅट आहेत. शेलार साहेबांच्या घरापासून 2 ते 3 मिनिटांवर आहे. तिथे नाव आढळून आलं, फहद गुलाम मोहम्मद पठाण. त्यांचा घर क्रमांक 77 आहे. या किनारा बिल्डिंगमध्ये 1 ते 14 फ्लॅट आहेत. मग 77 घरक्रमांक कुठून आला?. त्याची नोंदणी कशी झाली?. आशिष शेलार झोपले होते का?. आशिष शेलारांनी झोपायचं काम केलं का? आमचा शेलारांवर कुठला आरोप नाही. शेलार जागरुक नाही का?” असे सवाल संदीप देशपांडे यांनी विचारले.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.