AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतदारांनो, योग्य माहिती द्या, गोपनीयतेचा भंग केल्यास शिक्षा होणार; श्रीकांत देशपांडे यांचा इशारा

ऑनलाइन सर्टीफाय करताना आधारकार्ड ओटीपीद्वारे होणार असल्याचे सांगत व्होटर्स हेल्पलाईन अॅपद्वारेही याचा वापरही मतदार करू शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मतदारांनो, योग्य माहिती द्या, गोपनीयतेचा भंग केल्यास शिक्षा होणार; श्रीकांत देशपांडे यांचा इशारा
| Updated on: Jul 25, 2022 | 7:27 PM
Share

मुंबईः निवडणूक कायद्यात (Elction Law) अलीकडे काही बदल झाले आहे, हे सर्व बदल 1 ऑगस्ट 22 पासून संपूर्ण देशात लागू करण्यात येणार असून एप्रिल 2023 पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Chief Electoral Officer Shrikant Deshpande) यांनी सांगितली. यावेळी त्यांनी सांगितले की, मतदारानी दिलेली माहिती योग्य देणं महत्वाचं आहे, याची गोपनीयता कोणी भंग केली तर त्याला शिक्षा होणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी सांगितले की, हे कायद्याचं कठोर बंधन आणि निवडणूक आयोग (Election Commission) कर्मचाऱ्यांनाही लागू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आधार तयार करणाऱ्या एजन्सीला विशेष महत्व देण्यात आले असून नोंदणी/बदल सुविधा ऑनलाइनसुद्धा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

ऑनलाइन सर्टीफाय करताना आधारकार्ड ओटीपी

ऑनलाइन सर्टीफाय करताना आधारकार्ड ओटीपीद्वारे होणार असल्याचे सांगत व्होटर्स हेल्पलाईन अॅपद्वारेही याचा वापरही मतदार करू शकतात असंही त्यांनी यावेळी सांगितले. बूथ लेव्हल कर्मचारी 6ब क्रमांकाचा फॉर्म भरूनही नोंदणी करण्याची सुविधा मतदारांना देण्यात आली आहे. तर काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार बदल केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दर 3 महिन्यातील पहिला दिवस हा क्वालिफाईंग दिनांक

निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले की, मतदार क्वालिफाईंग हे 1 जानेवारी पूर्वी मतदारांनी करावयाचे आहे. तसेच आता दर 3 महिन्यातील पहिला दिवस हा क्वालिफाईंग दिनांक असणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. युवा मतदारांना अधिक मतदान करण्यात येणार असून पोस्टल मतदानात स्पाउस हा शब्द वाढविण्यात आला आहे. तसेच याबाबत जे अधिकार पतीला दिले आहेत तेच पत्नीला दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आधार कार्डशी कनेक्ट राहणार

मतदारयादीतील मतदार यांचे लिंकअप,आधार कार्डशी कनेक्ट राहणार आहे. तसेच आधार आणि मतदानासंबंधीत सर्व सुविधा मतदाराला मिळाव्या यासाठी हा बदल केले असल्याचे सांगण्यात आले आहे. आधार कार्डमुळे मतदार योग्य मतदार ओळखता येणार आहे. त्यामुळे आधार नसेल तर 11 पैकी 1 कागदपत्र, मतदाराला बाळगणं आवश्यक आहेत.

डबल लॉक सिस्टीम

मतदार रेकॉर्ड गोपनीयतेची जबाबदारीही सरकारी यंत्रणेची असून फिजिकल फॉर्मकरिता डबल लॉक सिस्टीम वापरण्यात येणार आहे. तसेचआधार माहिती संकलन प्रक्रिया अत्यंत गोपनीय पद्धतीनं केली जाणार आहे. याची माहिती बाहेर कोणाकडे जाणार नाही याची निवडणूक आयोगाने घेतली आहे असंही श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले ही माहिती देत असतानाच त्यांनी सांगितले की, उद्या सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होणार असून त्यांना या बदलांची माहिती देणार आहे. त्याबरोबरच कोणताही आधार क्रमांक, पब्लिक डोमेनमध्ये जाणार नाही याची खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती

तसेच फोटो सिमीलर एन्ट्री शोधण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत 40 लाख मतदार, व्हेरिफिकेशन करण्यात आले आहेत. त्याबरोबरच या मतदारयादीत 20 लाख डुप्लिकेट तर 11 लाख एन्ट्री संशयास्पद सल्याचं निष्पन्न झाले असल्याचेही त्यांनी सांगितले. 47 ते 48 टक्के संशयास्पद एन्ट्री असून त्याची प्रक्रिया सुरू असून छाननीनंतर डिलीट प्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच करताना तांत्रिक चुका झाल्याचं निष्पन्न झाल्य़ास चुका दुरुस्ती/वगळणे या दोन्ही प्रक्रिया सुरू असून 15 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.