AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Supply : मुंबईत पुढच्या आठवड्यात पाणीबाणी, जाणून घ्या, कुठे असेल पूर्णपणे पाणीबंद आणि कुठे कपात?

उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

Mumbai Water Supply : मुंबईत पुढच्या आठवड्यात पाणीबाणी, जाणून घ्या, कुठे असेल पूर्णपणे पाणीबंद आणि कुठे कपात?
पुढील आठवड्यात मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणारImage Credit source: tv9
| Updated on: May 11, 2022 | 6:56 PM
Share

मुंबई : मुंबई महानगर आणि उपनगरमधील एल, एन, एम पश्चिम, एफ उत्तर आणि एफ दक्षिण विभागातील काही परिसरांमध्ये पुढच्या आठवड्यात पाणीपुरवठा (Water Supply) बंद वा कपात करण्यात येणार आहे. बुधवार, 18 मे 2022 रोजी सकाळी 10 ते गुरुवार, दिनांक 19 मे 2022 सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद तसेच पाणी कपात (Water Reduction) करण्यात येणार आहे. सदर परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन (Appeal) महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पूर्व उपनगरामध्ये ‘एन’ विभागातील सोमैया नाल्याखालून महानगरपालिका वसाहत, विद्याविहार या ठिकाणी सूक्ष्मबोगदा (मायक्रोटनेलिंग) पद्धतीने जलवाहिन्या वळविण्याचे Phase-I चे काम बुधवार, दिनांक 18 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवार, दिनांक 19 मे 2022 सकाळी 10 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

सदर कालावधीत म्हणजेच बुधवार, दिनांक 18 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवार, दिनांक 19 मे 2022 सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईतील पूर्व उपनगरांमध्ये काही भागात पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शहरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार

‘एल पूर्व’ विभाग : राहुल नगर, एडवर्ड नगर, पानबजार, व्ही. एन. पुरव मार्ग, नेहरु नगरच्या दोन्ही बाजू, जागृती नगर, शिवसृष्टी नगर, एस. जी. बर्वे मार्ग, कसाईवाडा पंपिंग, हिल मार्ग, चाफे गल्ली, चुनाभट्टी पंपिंग स्वदेशी मिल मार्ग – (पहाटे 5.30 ते सकाळी 8.30 व रात्री 9 ते मध्यरात्री 3 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

‘एन’ विभाग : राजावाडीचे सर्व क्षेत्र, (एम. जी. मार्गाची पश्चिम बाजू), चित्तरंजन नगर, वसाहत, आंबेडकर नगर, निळकंठ व्हेली, राजावाडी रुग्णालय परिसर, विद्याविहार स्थानक, पूर्व बाजूचा रस्ता, ओ.एन.जी.सी. वसाहत मोहन नगर, कुर्ला टर्मिनल मार्ग, ओघड भाई रस्ता, आनंदी रस्ता रामजी, आशर रस्ता – (मध्यरात्री 3 ते सकाळी 9.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

‘एम पश्चिम’ विभाग : टिळक नगर सर्व क्षेत्र, ठक्कर बाप्पा वसाहत, वत्सलाताई नगर, सहकार नगर, आदर्श नगर, राजा मिलिंद नगर, राजीव गांधी नगर, गोदरेज आवार, कुटीरमंडल, सम्राट अशोक नगर, बीट नंबर 149 व 151 – (पहाटे 5 ते सकाळी 9.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

‘एफ उत्तर’ विभाग : वडाळा ट्रक टर्मिनल, न्यु कफ परेड, प्रतिक्षा नगर, पंचशिल नगर, शीव पूर्व आणि पश्चिम (बुस्टींग), सायन कोळीवाडा, संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, सरदार नगर, इंदिरा नगर, वडाला मोनोरेल डेपो – (पहाटे 4 ते सकाळी 9.30 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील).

या परिसरात पाणी कपात होणार

 ‘एफ दक्षिण’ विभाग : शहर उत्तर – दादर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुककर मार्ग, गोविंदजी केणे मार्ग, हिंदमाता – (सकाळी 7 ते 10 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).

शहर दक्षिण : परळ, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कंपनी गल्ली – (पहाटे 4 ते सकाळी 7 ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ. मात्र, कामादरम्यान पाणीपुरवठा कमी दाबाने होईल).

उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.