शिवसेना-भाजपला पाडू, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई: मराठा ठोक मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीविरोधात प्रचार करणार असल्याची घोषणा मराठा मोर्चाने केली. मराठा आरक्षण कोर्टात लटकवल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर केली. शिवसेना भाजपला राज्यात […]

शिवसेना-भाजपला पाडू, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई: मराठा ठोक मोर्चाने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीविरोधात प्रचार करणार असल्याची घोषणा मराठा मोर्चाने केली. मराठा आरक्षण कोर्टात लटकवल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या कोणत्याही उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका जाहीर केली.

शिवसेना भाजपला राज्यात बूथ लावू देणार नाही. जिथं जिथं शिवसेना भाजपची सभा असेल, तिथे आम्ही त्यांची सभा उधळून लावू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

“मी सरकारमध्ये आहे तेव्हा सगळ्यांवरचे गुन्हे माफ होतील, असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’वर गेलेल्या मराठा शिष्टमंडळाचा अपमान करुन त्यांना हाकलून दिलं”, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने आजच्या पत्रकार परिषदेत केला.

मराठ्यांना जाहीर केलेल्या 16 टक्के आरक्षणाचं पुढं झालं तरी काय ? शिक्षक भरतीत मराठ्यांना जागा मिळाल्या नाहीत. जेवढ्यांवर आंदोलनात गुन्हे दाखल झाले ते अजून मागे घेतले नाहीत. 42 जण जे मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना सामावून घेणार, असा शब्द दिला होता तो पाळला नाही. जर दोन दिवसात मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना भाजपवर बहिष्कार घालणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

काहीही झालं तरी आम्ही या सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीला मतदान करणार नाही, अशी माहिती छावा मराठा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी दिली.

ज्यांनी मराठा समाजाविरोधात भूमिका घेतली, त्यांना पाडण्याचं काम आम्ही करु. घराघरात जाऊन भाजप- शिवसेनेविरोधात  प्रचार करु. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी दिलेला शब्द पाळला नाही. उद्धव ठाकरे यांनी उद्वटपणे भाषा वापरली. मराठा समाज माझं काही वाकडं करायचं ते करा असं बोलले. यापुढे शिवसेनेविरोधात आता रान उठवणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.

शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो हा छत्रपती शिवरायांच्या खाली लावा, अन्यथा तीव्र आंदोलन करु,असाही इशारा दिला आहे.

आण्णासाहेब पाटील महामंडळ बरखास्त करा, त्यातून निधीच मिळत नाही. स्वार्थासाठी हे महामंडळ बनवल असेल तर हे बरखास्तच करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.