Weather Update : राज्यात थंडीनं केलंय मार्केट जाम; आता रात्रीच नाही तर दिवसा पण भरणार हुडहुडी

Cold Waves Weather Maharashatra : राज्यातील राजकारण तापलेलं असताना राज्यात थंडीने मार्केट जाम केलं आहे. उभा आडवा महाराष्ट्र थंडीने गारठलाय. गेल्या काही दिवसांपासून रात्री थंडीचा अंमल होताच, आता दिवस पण थंडीचा दरारा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अडगळीत पडलेला स्वेटर भाव खावून जाणार आहे.

Weather Update : राज्यात थंडीनं केलंय मार्केट जाम; आता रात्रीच नाही तर दिवसा पण भरणार हुडहुडी
महाराष्ट्र गारठला
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 9:27 AM

राज्यात मुख्यमंत्री पदावरून राजकारण तापलेलं असताना थंडीने मार्केट जाम केलं आहे. अवघा उभा-आडवा महाराष्ट्र थंडीच्या पट्ट्यात आला आहे. थंडीने मार्केट जाम केले आहे. महाराष्ट्र गारठला आहे. गावापासून ते शहरापर्यंत थंड हवेमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा अंमल होताच पण आता दिवसासुद्धा बोचरी, गुलाबी थंडी प्रत्येकाला जाणवणार आहे. आता गेल्या आठ महिन्यांपासून अडगळीत पडलेल्या स्वेटरला आता भाव आला आहे. तर काही जणांनी ऊबदार कपड्यांसाठी बाजारपेठ जवळ केली आहे. यंदा गारठा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

थंडीचा कडाका वाढला

हे सुद्धा वाचा

राज्यात थंडीचा कडाका वाढला. बंगालच्या उपसागरावरील वादळी वाऱ्यांनी थंडीचा खलिता पाठवला आहे. त्यातच उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींनी गारठ्याचे प्रमाण वाढवले आहे. बोचरी थंडी जाणवत असल्याने शुष्क, कोरडेपणा वाढत आहे. काहींना अंगाला खाज जाणवत आहे. या सर्व हवामान घडामोडींमुळे अनेकांचा वीकेंड एकतर उबदार कपड्यात अथवा पर्यटन स्थळी जाण्याची शक्यता आहे. या काळात हाडं गोठवणारी थंडी जाणवली तर आश्चर्य वाटू देऊ नका.

निफाड निच्चांकी, थंडीची लाट कायम

राज्यात गुरूवारी निफाडमध्ये सर्वाधिक पार घसरला. या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली. या परिसरात पारा 6 अंशांपर्यंत घसरला. तर इतर जिल्ह्यातही तापमान कमालीचे घटले. महाबळेश्वर आणि इतर थंडीच्या ठिकाणांपेक्षा राज्यातील काही भागात थंडीचा कडाका जाणवला. राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट कायम राहणार असल्याचे समजते. राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण दिसून येत आहे. तर यलो अलर्ट कायम आहे.

तामिळनाडूत फेंगल चक्रीवादळ

दक्षिणेकडील राज्यात चक्रीवादळाने जनजीवन विस्कळीत झाले. तामिळनाडू, कराईकल, पुद्दुचेरी यासह आंध्र प्रदेशाच्या किनार पट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रायलसीमामध्ये सुद्धा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर भारतात थंडीचा कहर असून दाट धुके असेल. या सर्व घडामोडींमुळे राज्यात थंडीचा जोर कायम असण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?
शिंदेंच्या आमदारानं घेतली शपथ पण एकही शब्द वाचता आला नाही?.
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान
'रवी राणाही आमदारकीचा राजीमाना देतील', नवनीत राणांचं विरोधकांना आव्हान.
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात
'...हा म्हणजे संविधानाचा अवमान', चंद्रशेखर बावनकुळेंचा 'मविआ'वर घणाघात.
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध
निकालानंतर खासगी संस्थेकडून सर्व्हेक्षण, 'सामना'तून थेट आकडेच प्रसिद्ध.
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'
'मी असताना राज ठाकरेंची गरज काय? त्यांना महायुतीत घेतल्यानं नुकसानच..'.
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव
'मारकडवाडीचा खरा मास्टर माईंड तर...', राम सातपुतेंनी थेट घेतलं नाव.
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.