AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update | राज्यात उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी, मच्छिमारांनाही समुद्रात जाण्यास मनाई

धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघरमध्ये आज 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तर कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. तरी मच्छिमारांनी या 24 तासामध्ये सुमद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Weather Update | राज्यात उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी, मच्छिमारांनाही समुद्रात जाण्यास मनाई
राज्यात उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 7:27 PM
Share

मुंबई : मुंबईसह राज्यात आज दिवसभर अवकाळी पावसाची रिपरिप सुरुच आहे. दिवसभरात पावसाने अजिबात विश्रांती घेतली नाही. हेच चित्र पुढचे 24 तास असणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान विभागाने राज्यात अलर्ट जारी केला आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

हवामान खात्याने काय सांगितले ?

गेल्या 48 तासात मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाळी वातावरण झालेलं आहे. याचं कारण म्हणजे दक्षिण पूर्व अरबी समुद्रामध्ये एक सायक्लॉन सर्कुलेशन तयार झाले आहे. त्याचबरोबर एक द्रोणीय भाग कच्छपर्यंत सरकलेला आहे. याचा प्रभाव उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात जास्त असेल. धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघरमध्ये आज 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तर कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. तरी मच्छिमारांनी या 24 तासामध्ये सुमद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पुण्यात दाट धुकं

पुण्यात पावसाचा जोर वाढला असून मोठ्या प्रमाणात दाट धुकं पसरलं आहे. पुढील दोन ते तीन दिवस पुणे आणि आसपासच्या परिसरात पाऊस कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

नाशिकमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस

इगतपुरी शहरात काल सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आज दुपारी 12.30 च्या दरम्यान पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र दुपारनंतर पावसाने जोर धरला. शहरात जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू असून हवेतल्या गारव्यामुळे नागरिक गारठले असून बाजारात शुकशुकाट पहावयास मिळाला.

अवकाळी पावसाचा देवगड हापूसला फटका

सतत बदलत असलेल्या हवामान बदलाचा फटका देवगड हापूसला बसला आहे. गेले 15 ते 20 दिवस जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि दमट वातावरणाचा सामना येथील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या आंबा मोहोराचा हंगाम असून देवगड हापूसच्या कलमांना चांगलाच बहर आला होता, मात्र दमट वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मोहर अक्षरशा कुजून घळून पडला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच देवगड हापूस कलमांना मोहोर येण्यास सुरुवात झाली असतानाच अवकाळी पावसामुळे पहिल्या टप्यात येणारा आंबा वाया गेला आहे.

अवकाळी पावसामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान

आज सकाळपासूनच पालघर जिल्ह्यात रिपरिप पाऊस सुरू असून ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. मात्र या पावसामुळे वीटभट्टी तसेच गवतपावळी व्यापारी आणि बागायतदारांचे मोठं नुकसान झालं आहे. (Weather update orange alert issued in North Konkan and North Maharashtra)

इतर बातम्या

हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा मनस्ताप कमी होणार, पनवेल ते गोरेगाव थेट लोकल सुरु

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.