Maharashtra Lock Down : महाराष्ट्रात लागू केलेलं कलम 144 नेमकं काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलम 144 संपूर्ण महाराष्ट्रात नागरी भागात लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.

Maharashtra Lock Down : महाराष्ट्रात लागू केलेलं कलम 144 नेमकं काय?
प्रातिनिधिक फोटो
Nupur Chilkulwar

|

Mar 22, 2020 | 4:44 PM

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी देशभर जनता (What Is Section 144) कर्फ्यू लागू असताना, इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी कठोर निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरपुरतं मर्यादित असलेली जमावबंदी अर्थात कलम 144 संपूर्ण महाराष्ट्रात नागरी भागात लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आजपासून 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. शिवाय देशातील रेल्वेही 31 मार्चपर्यंत बंद असेल. याशिवाय राज्यातील (What Is Section 144) एसटी वाहतूक आणि खासगी वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

एकीकडे हे निर्णय जाहीर होत असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात कलम 144 अर्थात जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा : जमावबंदी ते लॉक डाऊन, मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या 9 घोषणा

काय आहे कलम 144?

सीआरपीसी अंतर्गत येणारे कलम 144 शांतता राखण्यासाठी लावण्यात येते.

मोठ्या संख्येने जमाव गोळा झाल्याने कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून हे कलम लागू केलं जातं

सध्या सामाजिक आरोग्यासाठी खबरदारी (What Is Section 144) म्हणून महाराष्ट्रात हे कलम लागू करण्यात आलं आहे

जमावबंदी लागू करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो

जमावबंदी लागू केल्यानंतर 5 किंवा त्यापेक्षा अधिक लोक एकत्र येऊ शकत नाहीत. याशिवाय शस्त्र घेऊन जाण्यासही बंदी असते.

उल्लंघन केल्यास शिक्षा काय?

कलम 144 च्या नियमाचं उल्लंघन केल्यास संबंधिताला अटक होऊ शकते

हा जामीनपात्र गुन्हा आहे, मात्र या गुन्ह्यात 1 (What Is Section 144) वर्षापर्यंतची शिक्षा असते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें