BMC Election 2022: मुंबई महापालिकेसाठी काय असेल भाजपाचा विजयाचा फॉर्म्युला? कशा जिंकणार 150 जागा? घ्या जाणून

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी 150 जागा जिंकण्याचे टार्गेट एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला दिलेले आहे. अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बैठक पार पडल्याची माहिती आहे. भाजपाचा 150 जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येते आहे. या 150 जागांबाबत जी राजकीय चर्चा सुरु आहे, ती  पाहूयात

BMC Election 2022: मुंबई महापालिकेसाठी काय असेल भाजपाचा विजयाचा फॉर्म्युला? कशा जिंकणार 150 जागा? घ्या जाणून
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 7:09 PM

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ही निवडणूक चुरशीची मानली जाते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही मैदानात उतरले असून, 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य शिवसेनेने ठेवले आहे. तर मुंबईत गणरायांच्या दर्शनासाठी आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी 150 जागा जिंकण्याचे टार्गेट एकनाथ शिंदे गट आणि भाजपाला दिलेले आहे. अमित शाहा यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठकही पार पडली. त्यानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही बैठक पार पडल्याची माहिती आहे. भाजपाचा 150 जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगण्यात येते आहे. या 150 जागांबाबत जी राजकीय चर्चा सुरु आहे, ती  पाहूयात

काय आहे भाजपाचा 150 जागांचा फॉर्म्युला?

2022 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 150 जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य असले तरी त्याला तीन भागात विभागण्यात आलेले आहे. 82+30+40 असा हा फॉर्म्युला ठरवण्यात आलेला आहे. हे तीन टप्पे कोणते आहेत ते जामून घेऊयात

1. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला 227 पैकी 82 जागा मिळाल्या होत्या. या 82 जागांवर पुन्हा एकदा पक्षाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. या 82 जागा पुन्हा विजय मिळवण्याचा भाजपाचा पहिला प्रयत्न असेल.

हे सुद्धा वाचा

2. 2017 च्या निवडणुकीत भाजपा 227 प्रभागांपैकी 58 जागी भाजपा दुसऱ्या क्रमांकावर होती. या 58 जागांपैकी 30 जागांवर भाजपा लक्ष केंद्रीत करणार आहे. या 58 जागांपैकी 30 जागी यश मिळवण्याची भाजपाची योजना आहे.

३. शेवटच्या 40 जागा या स्वबळावर जे निवडून येऊ शकतात. त्यांच्यासाठी असणार आहेत. यात ज्या कार्यकर्त्यांची स्वबळावर निवडून येण्याची तयारी असेल, त्यांना पक्षाकडून तिकिटे दिली जाण्याची शक्यता आहे. या 40 जागा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या 30 जागांवर एकनाथ शिंदे गटाची आणि मनसेचीही मदत घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

शिवसेनेची 2017 साली काय होती स्थिती?

2017 साली शिवसेनेला 227 पैकी 84 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे उमेदवार 89 प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यात शिवसेना विरुद्ध भाजपा अशा थेट लढतीत 62 ठिकाणी भाजपा तर 43 ठिकाणी शिवसेना जिंकली होती.

युती, आघाडीवरही निकाल बदलणार

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच काँग्रेस या आघाडीत सहभागी होणार का, हाही मुद्दा आहे. महाविकास आघाडी अशी एकत्रित निवडणूक लढल्यास शिवसेनेला काही प्रभागात फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र जागावाटपात रस्सीखेच पाहयाला मिळेल.

भाजपा, शिंदे गट आणि मनसे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यातही शिंदे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा सध्या सुरु आहे. /यातही जागावाटपात कुणाच्या पदरात किती जागा येतील, यावरही गणितं ठरणार आहेत. असे झाल्यास मुंबईतील अनेक प्रभागात युतीला फायदा होण्याची चर्चा व्यक्त करण्यात येते आहे.

मुंबई महपालिकेतील पक्षीय बलाबल

शिवसेना- 84 भाजपा-82 काँग्रेस – 31 राष्ट्रवादी – 09 मनसे – 07 सपा- 06 एमआयएम – 02 अखिल भारतीय सेना – 01 अपक्ष – 05

एकूण जागा- 227

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.