Mansukh Hiren death: धनंजय गावडेंना शेवटचे भेटले, 40 किमीवर बॉडी मिळाली, फडणवीसांनी उल्लेख केलेले धनंजय गावडे कोण?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसुख हिरेन प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. (who is dhananjay gawade? why devendra fadnavis allegations him in Mansukh Hiren case?)

  • विजय गायकवाड, टीव्ही 9 मराठी, विरार
  • Published On - 13:09 PM, 9 Mar 2021
Mansukh Hiren death: धनंजय गावडेंना शेवटचे भेटले, 40 किमीवर बॉडी मिळाली, फडणवीसांनी उल्लेख केलेले धनंजय गावडे कोण?
dhananjay gawade

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसुख हिरेन प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरलं. मनसुख हिरेन हे धनंजय गावडेंना शेवटचे भेटले होते. त्या ठिकाणापासून 40 किलोमीटरवर हिरने यांची बॉडी सापडली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (who is dhananjay gawade? why devendra fadnavis allegations him in Mansukh Hiren case?)

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

हिरेन मृत्यूप्रकरणात अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे २०१७ चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यामध्ये दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचं नाव आहे धनंजय विठ्ठल गावडे आणि दुसरा सचिन हिंदुराव वझे. मनसुख हिरेन यांचं शेवटचं लोकेशन आहे ते धनंजय विठ्ठल गावडे यांच्याठिकाणी आहे. 40 किमीवर बॉडी सापडते. गावडेच्या ठिकाणी जाण्याचे कारण काय? काहीच नाही. गावडेच्या ठिकाणापासून ४० किमीवर हिरेन यांची बॉडी सापडली. त्यामुळे हे स्पष्ट आहे, यापेक्षा अधिक पुरावे काय हवेत?, असं फडणवीस म्हणाले.

कोण आहेत गावडे?

धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक होते. गावडे हे 45 वर्षीय आहेत. ते पालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखही होते. गावडे हे 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ६३ मधून नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु, बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. आचोळे येथील २६ गुंठे जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे 2017 मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

फसवणूक, खंडणी, बलात्काराचा आरोप

धनंजय गावडे हे नालासोपाऱ्यातील वादग्रस्त माजी नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर फसवणूक, खंडणी मागणे आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्यावर 2018मध्ये एका 34 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधी त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही बिल्डरांनी त्यांच्यावर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. भाईंदर येथील एका विकासकाकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच 2016मध्ये आयकर विभाग आणि ईडीने त्यांच्या घरी छापे मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 40 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. ही रक्कम ईडीला गावडे यांच्या गाडीत मिळाली होती.

एकूण 9 एफआयआर

धनंजय यांच्यावर एकूण 9 एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्यात बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या एफआयआर 2015 ते 2018 दरम्यान दाखल करण्यात आल्या. धनंजय याने बिल्डरांना धमकी दिली की बांधलेल्या इमारती महापालिकेच्या प्लानिंगनुसार नाहीत. त्या तोडल्या जाऊ शकतात. महितीच्या अधिकाराखाली त्यांने ही माहिती काढल्याचं त्याने सांगितलं. आणि पैशांची मागणी केली. 500 हुन अधिक प्रकरणाची धनंजय आणि त्याच्या साथीदाराने माहिती मागवली, आणि त्याच माहितीच्या आधारे लोकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला. 2015 साली धनंजय गावडे वसई-विरार मनपात नगरसेवक म्हणून निवडून आले. गावडेंवर वसई, नालासोपारा, तुलिंज, वालीव, विरार पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी 10 च्यावर गुन्हे दाखल आहेत.

1 कोटींच्या नोटा सापडल्या

नोटबंदी काळात गावडे यांच्याकडे 1 करोड 22 लाख नव्या नोटा सापडल्या होत्या. इन्कम टॅक्स अधिकारी आणि नालासोपारा गुन्हे शाखेने त्यांच्यावर सापळा रचून रंगेहाथ नोटांसह पकडले होते.

गावडेंकडून अनधिकृत बांधकामाच्या रॅकेटचा पर्दाफाश

नगरसेवक म्हणून निवडून आल्या नंतर धनंजय गावडे यांनी माहितीचा अधिकारा अंतर्गत वसई-विरार मधील अनाधिकृत बांधकामाचे मोठे रॅकेट बाहेर काढले होते. 2016-17 मध्ये 1 करोडची लाच मागितल्या प्रकरणी वसई विरार महापालिकेचे नगरचनाकार वाय एस रेड्डी यांना लाचलुचपत विभागाला पकडून दिले होते.

गावडेंचा दावा

गावडेकडून असा युक्तीवाद करण्यात आला की, आपण हे प्रकरण उघडकीस आणत होतो. अनधिकृत बांधकामांना परवानगी देण्यामध्ये महापालिकेतील काही अधिकारी आणि बिल्डर यांची साखळी गुंतलीय. हाच पर्दाफार्श करत असल्याने, बिल्डरांकडून या तक्रारी दाखल करण्यात आल्या. कलम 384, 504, 506 नुसार धनंजय गावडेवर गुन्हे दाखल.

फरार, गुजरातमध्येही शोध

खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गावडे यांना 2018मध्ये फरार घोषित करण्यात आले होते. एकामागून एक गावडे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने मागच्या 2 वर्षांपासून गावडे हे वसई विरार नालासोपारा परिसरातून फरार होते. त्यांना गुजरातमध्येही शोधण्यात आलं होतं. (who is dhananjay gawade? why devendra fadnavis allegations him in Mansukh Hiren case?)

कोर्टाकडून जामीन

आता काही गुन्ह्यात उच्य न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केल्याने ते वसई विरार परिसरात असल्याची माहिती आहे. गावडे यांचे नालासोपारा पूर्व घर, ऑफिस आहे, तसेच ठाणे येथे त्यांचे घर आहे. तर विरार पूर्व मांडवी विभागात सायवन याठिकाणी त्यांचा फार्म हाऊस आहे.

खंडणीची मोडस ऑपरेंडी

खंडणी वसूलीसाठी गावडेंची एक मोडस ऑपरेंडी होती. वसई-विरारमधील कोणतंही बांधकाम असो त्याविरोधात ते आधी आरटीआय टाकायचे. ते बांधकाम अनधिकृत असल्यास अधिकृत करून देतो सांगून बिल्डर्सकडून लाखो रुपये वसूल करायचे. मात्र, हे बांधकाम अधिकृत होत नसायचे. बेकायदा मोहिमेअंतर्गत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यापैंकी 7 गुन्हे गावडेंवर आहेत. (who is dhananjay gawade? why devendra fadnavis allegations him in Mansukh Hiren case?)

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

‘त्यांना वाटलं खाडीला भरती आहे मनुसख हिरेनची बॉडी कधी सापडणारच नाही, पण…’

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

(who is dhananjay gawade? why devendra fadnavis allegations him in Mansukh Hiren case?)