शरद पवारांचा एकेरी उल्लेख, ज्याला टोपी लागायची ती लागली म्हणणारे पाटील, आता जीभ घसरली का म्हणतायत?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर त्यांची विधाने सतत बदलत गेले.

शरद पवारांचा एकेरी उल्लेख, ज्याला टोपी लागायची ती लागली म्हणणारे पाटील, आता जीभ घसरली का म्हणतायत?
chandrakant patil


मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर त्यांची विधाने सतत बदलत गेले. आधी आपल्या मतावर ठाम असलेले पाटील चौफेर टीका होऊ लागल्याने नरमले आहेत. आता तर त्यांनी पवारांबद्दल बोलताना माझी जीभ घसरली असं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटील सातत्याने का बदलत गेले? पवारांबद्दलच्या विधानाने त्यांच्या अडचणीत वाढल्या का? यावर टाकलेला हा प्रकाश.

चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर आम्ही त्याला जाऊ दिलं नाही. सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केलं होतं. तर देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना, त्यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्याशिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं. मी कीय त्या नेत्याचं नाव घेणार नाही. माझ्यावर केसेस सुरु आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं पाटील म्हणाले होते.

ज्याला टोपी लागायची त्यांना लागली

चंद्रकांतदादांच्या या विधानानंतर एकच गदारोळ उडाला. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. पण चंद्रकांत दादा आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. मी कुणाचंही नाव घेतलं नाही. ज्याला टोपी लागायची त्याला लागली, असं दादांनी कोल्हापुरात स्पष्ट केलं.

आदर आणि उदाहरण

मात्र, हे प्रकरण अधिकच चिघळत असल्याचं लक्षात आल्यानंतर चंद्रकांतदादा बॅकफूटवर आले. साखर उद्योगाबाबत पवारांना जेवढं कळतं तेवढं कुणाला कळत नाही. प्रमोद महाजनांनी आम्हाला सांगितलं होतं की, मुख्यमंत्री होताना पवारांनी 40 गोष्टी लिहून काढल्या. त्यातील 38 गोष्टी पूर्ण केल्या. असं केलं पाहिजे. अनेकवेळा मी त्यांच्यावर टीका करतो. पण ते वैयक्तिक भांडण नाही. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. माझ्या त्यांच्याबद्दलच्या आदराच्या वक्तव्याचं एक पेटारा भरेल. एखाद्या ठिकाणी काही झालं तर त्याबद्दल वावटळ उठवण्याची गरज नाही. माझ्या मनात पवारांबद्दल आदरच आहे, असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

जीभ घसरली

शरद पवार साहेबांबद्दल मी आदराने बोललेल्या क्लिपचा पेटारा भरेल. मी त्या त्या वेळेस पवारांबद्दल आदराने बोललो ते पण कुठे तरी कोट करा. सांगलीला एक घरगुती कार्यक्रम होता. सार्वजनिक नव्हता. कोणत्याही माणसाचं स्लिप ऑफ टंग होतं. तसंच माझं स्लिप ऑफ टंग एका क्षणापुरतं झालं. तुम्ही क्लिप पाहिली तर लक्षात येईल. हे भाषण केवळ कार्यकर्त्यांना उद्देशून होतं, असं पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या:

मोठेपण ! चंद्रकांत पाटील म्हणाले, माझी जीभ घसरली, नेमकं काय झालं?

गुरमीत राम रहीमसह 5 दोषींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

‘सरकारनं हे एक तरी पारदर्शक काम करावं’, आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावरुन बच्चू कडूंचा घरचा आहेर

(why chandrakant patil back foot on comment on sharad pawar?)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI