शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना येण्यापासून का थांबवलं, अजित पवारांनी सांगितलं कारण…

विधानसभा अध्यक्षपद मविआ सरकारला भरायचं आहे. घटनाबाह्य आणि घटनात्मक अडचण राहायला नको, याची खबरदारी आम्ही बाळगली. राज्यपालांना ठाकरेंनी पत्र पाठवलं होतं. राज्यपालांची भेटही घेतली होती.

शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना येण्यापासून का थांबवलं, अजित पवारांनी सांगितलं कारण...
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 10:45 PM

मुंबई: हिवाळी अधिवेशनाचं (Winter session) आज अखेर सूप वाजलं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) अखेरपर्यंत या अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने अनेकदा उचलून धरला. टीका, टिप्पणी करताना अनेक सल्लेही दिले. पण अखेरपर्यंत मुख्यमंत्री सभागृहात आले नाहीत.

मुख्यमंत्री अधिवेशनाला का आले नाहीत? त्याबद्दल आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. “मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहतील, असा मीही दावा केला होता. पण कोरोनाचे आकडे वाढल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही येऊ नका” असे अजित पवार म्हणाले.

“अधिवेशन सुरु होण्याआधी मुख्यमंत्री सभागृहात येऊन गेले होते. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे मार्गदर्शन केलं होतं. वर्षा बंगल्यावर स्वतः ते असतात. विधिमंडळात झालेल्या प्रत्येक विषयामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करायचे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आम्ही पाहिली. ते लवकरच आपल्यासोबत असतील” असे अजित पवार म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाबद्दल म्हणाले... “विधानसभा अध्यक्षपद मविआ सरकारला भरायचं आहे. घटनाबाह्य आणि घटनात्मक अडचण राहायला नको, याची खबरदारी आम्ही बाळगली. राज्यपालांना ठाकरेंनी पत्र पाठवलं होतं. राज्यपालांची भेटही घेतली होती. घटनात्मक बाबी असल्यानं ते मी तपासतोय, असं राज्यपालांनी सांगितलं. पण आता सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे होऊ लागल्या आहेत. गुप्त मतदान करण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे, अध्यक्षांच्या बाबतीत. उघड-उघड किंवा आवाजी मतदानानं मतदान होतं. त्याचप्रमाणे मतदान व्हाव अशी आमची मागणी होती. काहीकाही बाबतीत त्यात दहा दिवस थांबावं लागतं. महामहिम राज्यपाल ही पण एक महत्त्वाची व्यक्ती आहे, त्यांचाही आदर ठेवला पाहिजे. अशी आमची सगळ्यांची भावना होती. त्यामुळे आम्ही स्पीकर फोनवर बोललो, ते आजच्या आज बोलणं आम्हाला शक्य नव्हतं”

“आता 28 फेब्रुवारीला नागपुरात अधिवेशन घ्यायचं ठरलंय. त्या मधल्या काळात या सगळ्या अनुषंगानं शंका-कुशंका राहणार नाही. बहुमताच्या जोरावर आम्ही कोणत्याही गोष्टी रेटू शकलो असतो, पण घटनेची कुठेही पायमल्ली झाली नाही पाहिजे, हे आम्हा तिन्ही पक्षांचं मत आहे”

२४ विधेयकं मंजूर केली “या अधिवेशनात जवळपास २४ विधेयकं मंजूर केली. प्रत्येक विधेयकाबाबत चर्चा झाली. एक विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्यात आला आहे. गृहविभागाचं विधेयकही बील मागे घेतलं. एकूण 28 विधेयकांबाबत काम या अधिवेशनात झालं. थोडासा गोंधळ झाला असेल, पण बऱ्यापैकी कामकाज व्यवस्थित पार पडलं. सगळीच विधेयकं महत्त्वाची होती. मात्र शक्तीविधेयक ऐतिहासिक म्हणावं लागेल” असे अजित पवारांनी सांगितलं.

इम्पिरिकल डेटासाठी ४३५ कोटी मंजूर “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत, यासाठी आम्ही एकमतानं निवडणूक आयोगाकडं मागणी करणार आहोत. चारशे पस्तीत कोटी रुपये इम्पिरिकल डेटासाठी मंजूर केले आहेत” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

मला माहितही नव्हतं की आमच्या गाडीच्या चालक एक महिला आहेत कोकण दौऱ्यादरम्यान, तृप्ती मुळीक यांनी माझ्या शासकीय गाडीचं काम केलं. आम्हाला माहितही नव्हतं की आमच्या गाडीच्या चालक एक महिला कर्मचारी आहे ते.. तृप्तीसारख्या अनेक महिला गावखेड्यात आहेत. आणि हीच आपली ताकद आहे. समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी शक्तिविधेयक महत्त्वाचं काम करेल.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.