तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपत का प्रवेश केला? प्रवीण दरेकरांनी सांगितली त्यामागची Inside Story
"आज त्यांच्याकडे निवडणुकीसाठी मुद्दा उरला नाही. कालच विधिमंडळात देवेंद्रजींनी सांगितलं,जो पर्यंत चंद्र, सूर्य आहे, तो पर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. परंतु भावनेला हात घालायचा. त्यांना विकासाच राजकारण जमत नाही" अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

“तेजस्वी घोसाळकर यांचे पती मुंबई बँकेचे संचालक होते. आपल्याकडे माणुसकी असते, एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आधार देणं मानवतेच्या दृष्टीकोनातून आपली जबाबदारी असते. त्याच भूमिकेतून त्या मुंबई बँकेवर संचालिका झाल्या होत्या. आज देवाभाऊंच्या नेतृत्वावर, त्यांच्या विकास कामांवर प्रभावित होऊन, मुंबई ज्या पद्धतीने देवाभाऊ विकसित करतायत, त्याचा प्रभाव त्यांच्यावर आहे. त्यातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला” असं भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाची साथ आज सोडली. त्या अनेक वर्ष शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. घोसाळकर कुटुंब हे ठाकरे कुटुंबाशी निष्ठावान मानलं जातं.
तेजस्वी घोसाळकर यांनी पक्ष सोडताना भावनिक पोस्ट केली आहे. पक्ष सोडताना दडपण येतं, काम होणं गरजेचं असतं असं त्यांनी म्हटलय. त्यावर प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं. “स्वाभाविकपणे एखाद्या पक्षात अनेक वर्ष काम केल्यानंतर कुटुंबातून बाहेर पडताना जे दु:ख होतं, त्या संवेदना त्यांच्यात दिसल्या. ज्याला राजकारणात, समाजकारणात कार्य करण्याची, विकासाची भूक असते, समाजाप्रती काही करायचं असतं, ज्या विश्वास असतो इथे काम होऊ शकतं. देवाभाऊंवर मुंबई महाराष्ट्राचा विश्वास आहे. विकासासाठी भाजपासारख्या चांगल्या पक्षाला प्राधान्य आहे. मोदी साहेबांचा विकास, देवाभाऊंचा विकास यावर प्रभावित होऊन त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे खरेखुरे होते
दादारमध्ये मराठी माणसाचे एकत्र येण्याचे बॅनर लागले आहेत, त्यावर प्रवीण दरेकर बोलले की, “हे सर्व ढोंग आहे, सोंग आहे. मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे खरेखुरे होते. महापालिकेतले कॉन्ट्रॅक्टर, ठेके बघा 25 वर्ष हे त्यांची तळी वाहत आहेत. आज देवाभाऊ, शिंदेसाहेब मराठी माणसासाठी काम करत आहेत” “आम्ही सर्व या मातीतलेच आहोत. भाजपचं मुंबईच नेतृत्व कोण करतय? अमित साटम, आशिष शेलार आणि मी कोण आहे? असं प्रवीण दरेकर म्हणाले.
