AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नानाभौ कसे मुख्यमंत्री होणार? काँग्रेसचा स्वबळाचा नारा किती वास्तववादी?; वाचा सविस्तर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री व्हायला आवडणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

नानाभौ कसे मुख्यमंत्री होणार? काँग्रेसचा स्वबळाचा नारा किती वास्तववादी?; वाचा सविस्तर
nana patole
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 11:41 AM
Share

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भ दौऱ्यावर असताना स्वबळाचा नारा दिला. केवळ स्थानिक स्वराज्य संस्थाच नाही तर विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री व्हायला आवडणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. त्यालगोलग काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही स्वबळाची भाषा आधीच बोलून दाखवली आहे. त्यामुळे काँग्रेस खरोखरच स्वबळावर सत्तेत येऊ शकते का? काँग्रेसचा स्वबळाचा नारा किती वास्तवादी आहे? की बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर डॅमेज कंट्रोलचं राजकारण सुरू केलंय? या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा वेध. (will congress can contest assembly elections alone in maharashtra?)

काँग्रेसकडे पर्सनॅलिटीच नाहीये

काँग्रेस स्वबळावर लढवेल आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल हे शक्यच नाही. काँग्रेसकडे मुळात राज्याला अपील होईल असं विलासराव देशमुखांसारखं नेतृत्व आज घडीला नाहीये. बाकीचे काँग्रेसचे नेते पदाधिकारी आहेत म्हणून नेते आहेत. प्रत्यक्ष पाहिलं तर ते त्यांच्या मतदारसंघापूरते मर्यादित आहेत. राज्यस्तरीय प्रतिमा असलेला नेता काँग्रेसमध्ये नाही, असं ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी सांगितलं. अशोक चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे मतदारसंघापुरतेच मर्यादित आहे. शरद पवारांनी विधानसभेत स्वत:च्या बळावर खेचून नेलं नसतं तर काँग्रेसची अवस्था काय झाली असती? काँग्रेसचे किती नेते मागच्या विधानसभेत फिरत होते. प्रत्येकजण आपल्या मतदारसंघातच अडकून पडला होता. थोडक्यात काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपदासाठी पर्सनॅलिटीच नाहीये. शिवाय काँग्रेसमध्ये गटबाजीही आहेच. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर लढेल आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल असं वाटत नाही, असंही दिवाकर शेजवळ यांनी सांगितलं.

‘स्वबळ’ हा दबावतंत्राचा भाग

काँग्रेस स्वबळावर लढणार नाही. त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीवर प्रेशर ठेवायचं आहे. हा दबाव तंत्राचा भाग आहे. मुळात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जे यश मिळालं ते मुळात शरद पवारांनी एकहाती खिंड लढवल्यामुळेच मिळालं. त्यामुळे काँग्रेसची अवस्था वाईट आहे. त्यांना उसनं आवसान आणावं लागतं. त्याशिवाय पक्ष कार्यकर्त्यांमध्ये जोम भरणार कुठून? जास्तीत जास्त जागा पदरा पाडून घेण्यासाठीचा काँग्रेसचे हे डावपेच आहेत, असं ‘आपलं महानगर’चे ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील जावडेकर यांनी सांगितलं.

44 आमदार

राज्यात बहुमतासाठी 145 आमदार निवडून येणे आवश्यक आहे. मात्र, राज्याच्या विधानसभेत काँग्रेसचे अवघे 44 आमदार आहेत. तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. म्हणजे काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची संख्या अधिक आहे. तर काँग्रेसला राज्यात सत्ता स्थापन करायची असेल तर काँग्रेसला 145 आमदार निवडून आणणे आवश्यक आहे. सध्या काँग्रेसकडे 44 आमदार असल्याने काँग्रेसला अजून 101 जागा जिंकून आणणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप सारखे तुल्यबळ पक्ष असताना काँग्रेसला हा आकडा गाठणे कठिण असल्याचं सांगितलं जात आहे.

पक्षीय बलाबल

भाजप – 105 शिवसेना – 56 राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 44 बहुजन विकास आघाडी – 03 प्रहार जनशक्ती – 02 एमआयएम – 02 समाजवादी पक्ष – 02 मनसे – 01 माकप – 01 जनसुराज्य शक्ती – 01 क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 शेकाप – 01 रासप – 01 स्वाभिमानी – 01 अपक्ष – 13 एकूण – 288

एकच खासदार

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी केवळ एका जागेवर विजय मिळविण्यात काँग्रेसला यश आले आहेत. काँग्रेस खासदार सुरेश धानोरेकर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. धानोरकर हे शिवसेनेचे वरोरातील आमदार होते. त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विजयी झाले. त्यामुळे एक खासदार आणि 44 आमदारांच्या बळावर काँग्रेसला सत्ता कशी संपादन करता येईल आणि नाना पटोले यांना मुख्यमंत्री कसे बनता येईल? असा सवाल केला जात आहे.

गटबाजीचे काय?

मुंबई काँग्रेसमध्ये अनेक गट आहेत. प्रत्येकाचा स्वतंत्र कारभार आणि प्रत्येकाची वेगळी लॉबिंग चालते. मिलिंद देवरा, प्रिया दत्त, अमरजितसिंह मनहास, जनार्दन चांदूरकर आणि संजय निरुपम हे सर्वजण स्वयंभू नेते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर, महाराष्ट्रात अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदींचे सवतेसुभे आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत राज्य पातळीवरील आणि जिल्हा पातळीवरील गटबाजी मोडून काढण्यात काँग्रेस किती यशस्वी ठरेल? इतर पक्षांपेक्षा गटबाजीमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी पटोलेंचा काय प्लान आहे? आदी प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यातून काँग्रेस कसा मार्ग काढणार त्यावर काँग्रेसचं भवितव्य अवलंबून असल्याचं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. (will congress can contest assembly elections alone in maharashtra?)

संबंधित बातम्या:

विधानसभा निवडणूकही स्वबळावर लढवा; नाना पटोलेंच्या ‘स्वबळा’ला नसीम खान यांचे बळ

स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार, नाना पटोलेंचा पुनरुच्चार

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

(will congress can contest assembly elections alone in maharashtra?)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.