संजय राठोडांची विकेट पडणार? 48 तास महत्वाचे, काऊंटडाऊन सुरु, भाजपाचा दबाव वाढला!

विधीमंडळ अधिवेशनाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर (Will Sanjay Rathod Resign From His Position) विरोधक आक्रमक झाले आहेत.

संजय राठोडांची विकेट पडणार? 48 तास महत्वाचे, काऊंटडाऊन सुरु, भाजपाचा दबाव वाढला!
sanjay rathod
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 9:00 AM

मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाला आता अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर (Will Sanjay Rathod Resign From His Position) विरोधक आक्रमक झाले आहेत. वनमंत्री संजय राठोड यांच्यासाठी पुढचे 48 तास महत्वाचे असून पक्षानं त्यांना ‘निर्णय’ घेण्याच्या सुचना दिल्याची सूत्रांची माहिती आहे (Will Sanjay Rathod Resign From His Position).

राजीनाम्याची पार्श्वभूमी कशी तयार झाली?

पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप आहेत. ते जवळपास पंधरा दिवस लोकांसमोर आले नाहीत. दरम्यान भाजपानं त्यांच्यावरचे हल्ले वाढवले. राठोड जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा त्यांनी थेट शक्तीप्रदर्शनच केलं. मुख्यमंत्र्यांनी कोविडच्या नियमांचं पालन करण्याच्या सुचना दिलेल्या असताना खुद्द राठोडांनी त्या धुडकावल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. त्यानंतर राठोड मातोश्रीवर भेटायला आले. त्यांना उद्धव ठाकरेंनी दीड तास ताटकळत ठेवल्याचं समजतं. त्यानंतरही त्यांना दोन एक मिनिटांची भेट देण्यात आली. त्या भेटीतच राठोडांना ‘निर्णय’ घेण्याचं सांगितलं गेल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांची नाराजी का ओढून घेतली?

कोविडचे नियम जाहीर झालेले असताना आणि पवारांपासून ते सामान्य नेत्यांपर्यंत सर्व जण स्वत:चे कार्यक्रम रद्द करत असताना संजय राठोड यांनी मात्र हजारोंच्या संख्येनं पोहोरादेवीगडावर कार्यकर्ते जमवून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासला. त्यानंतर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचीच प्रतिमा धोक्यात आली. खुद्द शरद पवारही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यातही पवारांनी संजय राठोड प्रकरणी नाराजी व्यक्त केल्याचं समजतं. दुसऱ्या बाजूने विरोधी पक्ष म्हणून भाजपानं संजय राठोड यांच्यावर हल्ले वाढवले आहेत. चित्रा वाघ ह्या वनमंत्र्यांवर सवालांवर सवाल विचारत आहेत आणि त्याची उत्तरं सध्या तरी सत्ताधाऱ्यांकडे नाहीत. अतुल भातखळकर,सुधीर मुनगंटीवार यांनीही, जोपर्यंत राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत अधिवेशन होऊ देणार नसल्याचं घोषीत केलं आहे.

आज भाजपाचा चक्का जाम

वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपानं आज चक्का जामची घोषणा केली आहे. मुंबईत हा चक्का जाम केला जात आहे. भाजपच्या महिला आघाडीतर्फे ह्या चक्का जामची घोषणा करण्यात आली आहे. त्यात भाजपचे नेतेही सहभागी होतील. विधीमंडळ अधिवेशन आता काही तासांवर आहे आणि सरकारवर दबाव वाढवण्याचं एक आयुध म्हणून ह्या चक्का जामची घोषणा केली गेली आहे. विशेष म्हणजे मोर्चे, आंदोलनं यावर सरकारनं कोविडमुळे आधीच बंदी आणलेली आहे. तरीही हा चक्का जाम केला जाणार आहे.

संजय राठोड यांच्यासमोरचे पर्याय संपले?

पुजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप आहेत. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे त्याचं राजकीय महत्वही मोठं आहे. ह्या संपूर्ण प्रकरणात संजय राठोड पंधरा दिवस जनतेसमोर आले नाहीत त्यामुळे संशय जास्त बळावत गेला. आल्यानंतरही त्यांनी थेट शक्तीप्रदर्शन केलं त्यामुळे आघाडीतल्या सहयोगी नेत्यांची नाराजी ओढवून घेतली. त्याच दबावामुळे मातोश्री नाराज झाली. संजय राठोडांनी जातीय आधार घेण्याचा केलेला प्रयत्नही जनतेला रुचलेला नाही. त्याचे पडसाद सोशल मीडियात जोरदार उमटत आहेत. त्यातून मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत असल्याचं दिसतं आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांच्याकडे चौकशी होईपर्यंत पदावरुन दूर हटण्याशिवाय काहीही पर्याय नसल्याचं जाणकारांना वाटतं.

Will Sanjay Rathod Resign From His Position

संबंधित बातम्या :

चित्रा वाघ यांचा संजय राठोडांसोबत मॉर्फ फोटो, आक्षेपार्ह फोटोवरुन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे तक्रार

संजय राठोड यांचे घटनेच्या दिवशी पूजाला 45 फोन, अरुण राठोडची 101वरून कबुली; चित्रा वाघ यांचा दावा

विनोद तावडे यांच्याकडून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी, म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांकडून अपेक्षा’

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.