अनाधिकृत मस्जिदीवर महापालिकेच्या हातोडा; या संदर्भात राज ठाकरे यांनी भर सभेत पत्र वाचून दाखवलं होतं…

या जागेवर महापालिकेच्या प्राथमिक शाळेचे आरक्षण असल्याने त्याच्यावर जे बांधकाम करण्यात आलेले आहे ते अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून तात्काळ या ठिकाणचा अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं महापालिकेने सांगितले आहे.

अनाधिकृत मस्जिदीवर महापालिकेच्या हातोडा; या संदर्भात राज ठाकरे यांनी भर सभेत पत्र वाचून दाखवलं होतं...
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 4:28 PM

सांगली : गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत सगळ्यांचा समाचार घेतला असला तरी त्यांनी मागे उपस्थित केलेल्या मस्जिदीच्या भोंग्यावरही त्यांनी यावेळी पुन्हा इशारा दिला. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुस्लिमांवर बोलत असताना मस्जिद आणि भोंग्यावर त्यांनी आपले रोखठोक मत व्यक्त केले. तसेच राज्यातील काही शहारांमध्ये अनाधिकृतपणे मस्जिदींचे बांधकाम केले जात आहे. त्यावरही त्यांनी जोरदार घणाघात केला.

त्यामुळेच आता राज्यातील पोलीस यंत्रणा आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेकडून आता पुढाकार घेण्यात आला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच्या आपल्या भाषणात अनधिकृत माहिमच्या खाडीतील दर्ग्याबाबत जोरदार टीका केली होती.

त्यावर त्यांनी प्रशासनाला मनसे स्टाईलने इशारा दिला होता. त्यामुळे माहिममधील दर्ग्याबाबत आता कारवाई सुरु करण्यात आली आहे. तशीच कारवाईचे संकेतही आता सांगलीच्या महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

सांगलीतील कुपवाडमध्ये मस्जिद बांधकामावरून जोरदार वादंग पेटला आहे. त्यासंदर्भातील एक पत्रही राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात वाचून दाखवले होते.

त्यामुळे सांगलीतील कुपवाडमध्ये होणाऱ्या मस्जिदीवर आता महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कारवाई होणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता कुपवाडमधील मस्जिदीवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या सांगलीतील मस्जिद ही अनधिकृत बांधकाम असल्याने आता सांगली महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

या जागेवर महापालिकेच्या प्राथमिक शाळेचे आरक्षण असल्याने त्याच्यावर जे बांधकाम करण्यात आलेले आहे ते अनधिकृत असल्याचा ठपका ठेवून तात्काळ या ठिकाणचा अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता राज ठाकरे यांच्या भाषणानंतर कारवाई करण्यात आल्याने सांगलीमधील कुपवाडची मस्जिदीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Non Stop LIVE Update
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले
मोदींची नेमणूक का केली ? टोला की कौतूक ? वाडकर नेमकं काय म्हणाले.
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास
भारताचं सामर्थ्य नवी भरारी घेणार,पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास.
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान
गेल्या दहा वर्षांत देशाला नैराश्यातून बाहेर काढले - पंतप्रधान.
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य
पहिल्या तीन औद्योगिक क्रांतीत मागे पडलोय पण..., मोदींचं मोठं वक्तव्य.
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन
...तर देशात आशेचा संचार कसा होईल? नरेंद्र मोदी यांचं रोखठोक प्रतिपादन.
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले...
WITT : मोदी यांच्याकडून tv9 नेटवर्कच्या कामाचे कौतुक, म्हणाले....
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं
हीच योग्य वेळ... कंगना राणावत लोकसभा लढवणार? मनातलं जाहीरपणे मांडलं.
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर
'फडणवीस यांच्याविरोधात एक शब्दही...,' काय म्हणाले प्रवीण दरेकर.
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल
'जरांगे कधी खोटं बोलत नाहीत, त्यांनी...,' काय म्हणाले कैलास गोरंट्याल.
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे
'फडणवीस तुम्ही काल चक्रव्युह रचला पण...,' काय म्हणाले मनोज जरांगे.