Election 2026 : विरार ते मालेगाव, बोगस मतदारांचा सुळसुळाट, समोर आलेल्या माहितीने खळबळ!
राज्यात 29 महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानानंतर महापालिकांचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे.

Municipal Corporation Election 2026 : राज्यात आज म्हणजेच 15 जानेवारी रोजी एकूण 29 महापालिकांसाठी मतदान होत आहे. राज्यभरात हजारो मतदान केंद्रांवर लोक आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत. या मतदानाचा निकाल 16 जानेवारी रोजी लागणार आहे. दरम्यान, आज मतदानाचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बोगस मतदान होत आहे, असा आरोप विरोधी पक्षांच्या नेते तसेच उमेदवारांकडून केला जात आहे. सोबतच अनेक ठिकाणी दुबार मतदान होत आहे, असेही म्हटले जात आहे. असे असतानाच आता विरार आणि मालेगाव येथा बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार विरारमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप केला जात आहे. येथे महेश राठोड या मतदाराच्या नावावर दुसऱ्याने अगोदरच मतदान केल आहे, असे सांगितले जात आहे. विरारमधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये ही घटना असल्याचे सांगितले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत खुद्द महेश राठोड याच मतदाराने सविस्तर सांगितले आहे. मी मतदान करायला गेलो होतो. पण त्यांनी मला सांगितलं की तुमचे मतदान झालेले आहे. मग मी सांगितलं की मी आताच आलो. माझे मतदान कसे झाले.पण ते मला तुमचे मतदान झालेले आहे असे सांगत होते, अशी माहिती महेश राठोड यांनी दिली आहे.
Municipal Election 2026
Maharashtra Mahapalika Election : ती शाई निघूच शकत नाही, निवडणूक आयुक्तांचा थेट दावा..
केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरते तीच आपण वापरली आहे- निवडणूक आयुक्त
शाई पुसली जात असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
BMC Election 2026 Voting : गोरेगावमध्ये बुथ सापडत नसल्याची मतदारांची तक्रार
उद्धव ठाकरे यांच्याकडून मुंबईतील प्रत्येक प्रभागाचा आढवा
[Dhule] Poll Percentage : धुळे महानगरपालिकेत किती टक्के झालं मतदान ?
दुसरीकडे दुबार मतदान झाल्याचा आरोप मालेगावमध्ये केला जातोय. येथे बोगस मतदान झाल्याच्या संशायमुळे गोंधळ घालण्यात आला. मालेगावमधील मतदान केंद्र क्रमांक 9 वर काही मतदार हे बोगस आहेत, असा आक्षेप एका उमेदवाराने घेतला. त्यानंतर वाद निर्माण झाल्यानंतर बोगस मतदाराने तिथून पळ काढला. आधार कार्डवर नाव नसूनही बोगस मतदान केल्याचा येथे आरोप करण्यात आला. वाद वाढल्यानंतर त्या मतदान केंद्रावर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
दरम्यान, या महापालिकेच्या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काहीही झालं तरी सर्व महापालिकांमध्ये आमचाच विजय होणार, असा दावे प्रत्येक पक्ष करत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.