AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचा वॉर्ड कुणासाठी राखीव? PCMC, वसई विरार, जालना, चंद्रपूर, नांदेड, मालेगाव महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर

Municipal Corporation Election Reservation: राज्यातील आगामी महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आहे. आज PCMC, वसई विरार, जालना, चंद्रपूर, नांदेड, मालेगाव महानगरपालिकेसह पालघरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

तुमचा वॉर्ड कुणासाठी राखीव? PCMC, वसई विरार, जालना, चंद्रपूर, नांदेड, मालेगाव महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर
municipal corporation election reservation
| Updated on: Nov 11, 2025 | 5:54 PM
Share

राज्यातील आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आहे. आज PCMC, वसई विरार, जालना, चंद्रपूर, नांदेड, मालेगाव महानगरपालिकेसह पालघरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव असणार आहेत. तसेच नियमानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या जागांची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वसई-विरार महापालिका

वसई विरार महापालिकेच्या 29 प्रभागातील 115 सदस्यांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. यातील 58 जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. या आरक्षण सोडतीत महिला राखीव जागेचा फटका सर्वसाधारण पुरुषांना बसला आहे. 29 पैकी 16 प्रभागात केवळ एकच जागा सर्वसाधारण पुरुषांना सुटली आहे. तसेच 20 नंबरच्या प्रभागात चारही जागांवर एससी, एसटी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. अनुसूचित जाती (sc) साठी 5 जागा आहेत, यातील 3 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जमाती साठी (एसटी) 05 यातील 3 जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग (obc) साठी 31 जागा आणि यातील 16 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आहेत. तर सर्वसाधारण (open) साठी 74 जागा असून, 36 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत.

जालना शहर महानगरपालिकेची आरक्षण सोडत

जालना शहर महानगरपालिकेची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. 16 प्रभागातील 65 जागांसाठी ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी 8 जागा राखीव करण्यात आल्या असून त्यापैकी 4 महिला असतील तर ओबीसीच्या 17 जागेपैकी 9 जागा महिलांसाठी राखीव झाल्या. शिवाय सर्वसाधारण 39 जागेपैकी 19 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या असून केवळ 1 जागा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव झाली आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आरक्षण सोडत

  • एकूण जागा – 128
  • सर्वसाधारण महिला – 35
  • इतर मागास प्रवर्ग महिला – 18
  • अनुसूचित जाती महिला-10
  • अनुसूचित जमाती महिला – 2
  • सर्वसाधारण पुरूष – 64

चंद्रपूर महानगरपालिका आरक्षत सोडत

  • एकूण जागा – 66
  • सर्वसाधारण महिला – 14
  • इतर मागास प्रवर्ग महिला – 9
  • अनुसूचित जाती महिला-7
  • अनुसूचित जमाती महिला – 3
  • सर्वसाधारण पुरूष – 33 जागा

मालेगाव महापालिका आरक्षण सोडत जाहीर

मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. एकूण 21 प्रभागांमधून 84 नगरसेवकांची निवड होणार आहे. यातील 50 टक्के जारा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. तर 22 जागा मागास प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. आता महापौरपदही महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता आहे.

नांदेड महानगरपालिकेसाठी 81 जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर

नांदेड महानगरपालिकेसाठी 81 जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 81 पैकी 15 जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत, यातील 8 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 जागा राखीव आहेत त्यापैकी, 1 एक जागा ही महिलासाठी राखीव आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 21 जागा आरक्षित आहेत, त्यापैकी 11 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. उर्वरित 43 जागा हा खुल्या प्रवर्गासाठी आहेत, यामध्ये 21 जागा ह्या महिलांसाठी आहेत.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.