राज्यात भाजपची तर मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला, गेल्यावेळी कोणाच्या ताब्यात किती महापालिका?
राज्यात गुरुवारी 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागली आहे. जाणून घेऊयात गेल्यावेळी कोणाच्या ताब्यात किती महापालिका होत्या.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती, अखेर मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. गुरुवारी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर शुक्रवारी महापालिका निवडणुकीचा निकाल आहे, दरम्यान यावेळी एकूण 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्तान राज्यात भजपची तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची प्रतिष्ठ पणाला लागली आहे. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे, परंतु गेल्या वेळी नेमकी काय स्थिती होती? आणि कोणाच्या ताब्यात किती महापालिका होत्या? याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
गेल्या वेळी एकूण 27 महापालिकांसाठी मतदान झालं होतं, मात्र यावेळी जालना आणि इचलकरंजी अशा दोन नव्या महापालिकांची भर पडली आहे, त्यामुळे यावेळी 29 महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळालं होतं. 17 महापालिकांमध्ये एकट्या भाजपची सत्ता आली होती, तर तीन महापालिका अशा होत्या त्यामध्ये भाजप -शिवसेना युतीची सत्ता आली होती. दुसरीकडे शिवसेनेची दोनच महापालिकेत सत्ता आली होती. तर ती महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती. एका महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रावादीची युती होती, तर एक महापालिका बहुजन विकास आघाडीला मिळाली होती. त्यामुळे आता गेल्यावेळेचा निकाल पहाता, यावेळीही भाजपचा दबदबा कायम राहणार का हे पहाणं महत्त्वाचा ठरणार आहे. तर मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
गेल्यावेळी कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता
मुंबई- 227 – शिवसेना, ठाणे – 131 – शिवसेना, कल्याण डोंबिवली – 122 – शिवसेना-भाजप, अहिल्यानगर – 68 – शिवसेना-भाजप, छत्रपती संभाजीनगर – 113 – शिवसेना भाजप, नवी मुंबई -111 – भाजप, उल्हासनगर – 78 – भाजप, मिरा भाईंदर – 96 – भाजप, पनवेल – 78 – भाजप, नाशिक – 122 – भाजप, जळगाव – 75 – भाजप, धुळे – 74 – भाजप, मालेगाव – 84 – भाजप, पुणे – 42 (नगरसेवक संख्या 162) – भाजप, पिंपरी चिंचवड – 32 (नगरसेवक संख्या 128) – भाजप, सोलापूर – 113 – भाजप, सांगली-मिरज-कुपवाडा – 78 भाजप, लातूर – 70 – भाजप, अमरावती – 87 – भाजप, अकोला – 80 – भाजप, नागपूर – 151 – भाजप, चंद्रपूर – 66 – भाजप, भिवंडी निजामपूर – 90 – काँग्रेस, नांदेड-वाघाळा – 81 – काँग्रेस, परभणी – 65 – काँग्रेस, वसई विरार – 29 (नगरसेवक संख्या 115) – बविआ, कोल्हापूर – 92 – काँग्रेस- राष्ट्रवादी, आणि दोन नव्या महापालिका इचलकरंजी – 76 जालना – 65