Municipal Election 2026 : एकच ईव्हीएम असणार की अनेक ? चार जणांना मतदान कसं करायचं ? पालिका निवडणुकीतील मतदानाची A to Z माहिती एका क्लिकवर
महापालिका निवडणुका जवळ येत असताना 'वॉर्ड' आणि 'प्रभाग' पद्धतीतील फरक, तसेच चार उमेदवारांना मतदान कसे करायचे याबाबत मतदारांमध्ये संभ्रम आहे. मतदान प्रक्रिया सविस्तर जाणून घेऊया. EVM वापरून तुम्ही चारही जागांसाठी योग्य पद्धतीने मतदान कसे करू शकता, याची स्टेप-बाय-स्टेप माहिती समजून घेऊ..

मतदानाला अवघे चार दिवस उरले आहेत. यंदा एक दोन नव्हे तर तब्बल 29 ठिकाणी महापालिका निवडणूक (Municipal Election Voting) होत आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या बड्या महापालिकांचाही समावेश आहे. तब्बल नऊ वर्षानंतर महापालिका निवडणुका होत असल्याने मतदारांचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे पारापारावर, नाक्या नाक्यावर फक्त आणि फक्त निवडणुकीच्या चर्चा ऐकायला येत आहेत. पण या निवडणुकीतील काही गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. काही ठिकाणी वॉर्डनिहाय तर काही ठिकाणी प्रभागनिहाय निवडणुका होत आहे. त्यामुळे वॉर्ड आणि प्रभागात काय फरक असतो हेच लोकांना कळत नाहीये. काही ठिकाणी पहिल्यांदाच प्रभागपद्धतीने मतदान होणार असल्याने तीन उमेदवारांना किंवा चार उमेदवारांना मतदान कसं करायचं? त्यासाठी ईव्हीएम मशीन चार असतील की एकच असेल की दोन असतील? चार मतदान करायचे तर मग बोटाला चारवेळा शाई लावायची का? असे एक ना अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत. मतदारांचा हाच संभ्रम दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रभाग म्हणजे काय? चार मतदान कसे करायचे? त्याच्या काय स्टेप्स आहेत? याचा आढावा घेऊया…
कसं करायचं मतदान ?
4 सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदान प्रक्रिया कशी असेल ते जाणून घेऊया.
- मतदान केंद्रावर कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 EVM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन असतील.
- तुम्हाला मतदान एकूण 4 म्हणजेच (अ) जागा, (ब) जागा, (क) जागा आणि (ड) जागेसाठी करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांच्या संख्येनुसार याच चारही जागांची आखणी EVM वर होईल. कदाचित या चारही जागा दोन EVM वर आखल्या जाऊ शकतात.
- चारही जागेसाठी मतपत्रिकांचे रंग वेगवेगळे दिलेले असतील. ‘अ’ जागेसाठी पांढरा रंग, ‘ब’ जागेसाठी गुलाबी रंग, ‘क’ जागेसाठी पिवळा रंग आणि ‘ड’ जागेसाठी निळा रंग असेल.
- प्रत्येक मशीनवर उमेदवाराचे नाव व त्याचे निवडणूक चिन्ह असेल. ‘अ’ जागेत खालील योग्य उमेदवारासमोरील बटण दाबा, लाल लाइट लागेल. याचा अर्थ अ जागेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
- ‘ब’ ,’ क’ आणि ‘ड’ या उर्वरित तिन्ही जागांसाठी हीच पद्धत वापरा.
- एखाद्या निवडणूक जागेसाठी उमेदवार योग्य आणि सक्षम वाटत नसेल तर मशीनवरील NOTA – None of the above किंवा वरीलपैकी कोणीही नाही असा होतो, ते बटण तुम्ही दाबू शकता.
- तुमचं एक मत देशाचं भविष्य बदलू शकतं. त्यामुळे विचार करून योग्य उमेदवा निवडण्याचा प्रयत्न करा.
- ड जागेसाठी मतदान केल्यानंतर बझर वाजेल. याचा अर्थ तुमची चारही जागांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
View this post on Instagram
