Don Arun Gawli : डॉन अरूण गवळीची तुरुंगातून कायमची सुटका; या नियमामुळे डॅडी बाहेर येणार?

अंडरवर्ल्ड डॉन, कुख्या गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याची मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. एक महिन्याच्या आत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे कोर्टाचे निर्देश देण्यात आले आहेत.

Don Arun Gawli : डॉन अरूण गवळीची तुरुंगातून कायमची सुटका; या नियमामुळे डॅडी बाहेर येणार?
डॉन अरूण गवळीची तुरुंगातून कायमची सुटका होणार ?
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 4:23 PM

अंडरवर्ल्ड डॉन, कुख्या गँगस्टर अरूण गवळी उर्फ डॅडी याची मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. एक महिन्याच्या आत अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे कोर्टाचे निर्देश देण्यात आले आहेत. 2006 सालच्या शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॅान अरुण गवळीनं शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अखेर नागपूर खंडपीठाने अरूण गवळी याच्या सुटकेचे निर्देश देत यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही देण्यात आला आहे.

नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात अरूण गवळी उर्फ डॅडी याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तसेच इतर गुन्हेगारी कृत्यासाठीही त्याला जन्मठेप ठोठावण्यात आली. सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

गँगस्टर अरुण गवळीच्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र, कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज निर्णय देताना नागपूर खंडपीठाने अरुण गवळी याच्या मुदतपूर्व सुटकेचे निर्देश दिले. मात्र, त्या संदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही दिला आहे. आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

काय आहे 2006 सालचा शासन निर्णय ?

10 जानेवारी 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार, वयाची 65 वर्षे पूर्ण केलेल्या, शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या आणि कारावासाची निम्मी शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना उर्वरित शिक्षेत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याची तरतूद आहे. याच ग्राऊंडवर अरुण गवळीला दिलासा मिळालाय. या शासन निर्णयाच्या आधारेच डॉन अरुण गवळीने शिक्षेतून मुदतीपूर्व सुटकेची मागणी केली होती, आणि न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात गृह विभाग आणि इतर प्रतिवाद्यांना हरकती घेण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांचा अवधी दिला आहे.

काय आहे कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरण ?

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात अरूण गवळी यावा जन्मठेपेची शिक्षा झाली. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. ही घटना 2 मार्च 2007रोजी घडली होती. कमलाकर जामसंडेकर यांचं त्यांच्या भागातील सदाशिव सुर्वे नावाच्या इसमासोबत प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. सदाशिवनेच गवळीच्या हस्तकांमार्फत ही सुपारी दिली होती.  त्यानंतर अरूण गवळीने या सुपारीची प्रताप गोडसेला जबाबदारी दिली होती. 2 मार्च रोजी कमलाकर जामसंडेकर यांची हत्या करण्यात आली.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.