AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून बाहेर पडू नका! विदर्भात उष्णतेची भीषण लाट, प्रशासनाने जारी केला हीट ॲक्शन प्लॅन

नागपुरात वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. दुपारच्या सत्रात कोचिंग क्लासेस आणि औद्योगिक कामगारांना विश्रांती बंधनकारक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी पाणी व सुरक्षिततेची तरतूद, तर महाविद्यालयांना दुपारच्या परीक्षा टाळण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णालयांनाही 'हीट ॲक्शन प्लान' सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी ही व्यापक पाऊले उचलण्यात आली आहेत.

घरातून बाहेर पडू नका! विदर्भात उष्णतेची भीषण लाट, प्रशासनाने जारी केला हीट ॲक्शन प्लॅन
उन्हाचा कहर वाढला
| Updated on: May 17, 2026 | 10:08 AM
Share

निम्मा मे महीना सरत आला तरी अजूनही उन्हा तडाखा कायम असून वाढत्या उन्हामुळे सर्वांच्याच तोंडचं पाणी पळालं आहे. राज्यभरात तसेच विदर्भातही तापमानाचा पारा वाढलेलाच आहे. काल अमरावती आणि वर्धा जिल्ह्याचा पारा पोहचला 46 वर तर अकोला आणि यवतमाळ 45 पार पोहोचल होता. तसेच नागपूरमध्येही उन्हाने कहर केला आहे. जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, ते लक्षात घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापक उपायोजनांचे आदेश जारी केले आहेत.

वाढत्या उष्णचेता प्रभाव, कोचिंग क्लासवर बंदी

वाढतं ऊन आणि उष्णता पाहता काही महत्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपुरात वाढत्या उष्णतेचा प्रभाव बघता उष्णतेमुळे दुपारी कोचिंग क्लासेस वर बंदी घालण्यात आली आहे. सर्व कोचिंग क्लासेसचे वर्ग हे सकाळी आणि सायंकाळच्या सत्रातच घेण्याचे निर्देश देण्यात आलेत. दुपारी 11 ते सायंकाळी 4.30 या वेळेत क्लासेस घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी क्लासेसमध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यासही सांगण्यात आलं आहे

एवढंच नव्हे तर महाविद्यालये, कॉलेजनेसनेही शक्यतो दुपारच्या सत्रात परीक्षा घेणं टाळावं असंही सांगण्यात आलं आहे. मात्र परीक्षा पूर्वनियोजित असल्यास विद्यार्थ्यांना थंड पिण्याचं पाणी देणं, तसेच परीक्षा हॉल थंड ठेवण्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

कारखाने आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीही विशेष निर्देश

उद्योग कारखाने आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी ही विशेष निर्देश देण्यात आले आहेत. दुपारी 11 ते 4 या वेळात कामगारांना विश्रांती देण्यात यावी असे सांगण्यात आलं आहे. तसेच उघड्यावर काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. कामगारांना त्यांचं काम सुरू ठेवणं अत्यावश्यक असेल तर सावलीसाठी शेड आणि थंड पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे, असे निर्देश सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. एवढंच नव्हे तर रुग्णालयात हीट ॲक्शन प्लान सज्ज ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत

विदर्भात तापमानाचा पारा वाढलेलाच

विदर्भात तापमानाचा पारा वाढलेलाच असून काल अमरावती आणि वर्धा जिल्ह्याचा पारा पोहचला 46 वर तर अकोला आणि यवतमाळ 45 पार तापमान होतं.

अकोला – 45.4

अमरावती – 46.0

वर्धा – 46.0

नागपूर – 43.8

बुलढाणा – 41.0

चंद्रपूर – 43.6

गोंदिया – 42.2

गडचिरोली – 42.6

यवतमाळ – 45.2

वाशीम – 43.2

Follow Us
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?