दुकानदारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, हा तुघलकी निर्णय, तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला महापौरांचा विरोध

नागपुरातील दुकानदारांनी 18 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करावी, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत (Nagpur Mayor Sandeep Joshi oppose Commissioner Tukaram Mundhe decision).

दुकानदारांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक, हा तुघलकी निर्णय, तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला महापौरांचा विरोध

नागपूर : “प्रत्येक दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 19 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करावी, असा प्रशासनाने घेतलेला निर्णय अयोग्य आणि प्रॅक्टिकल नाही”, अशी टीका महापौर संदीप जोशी यांनी केली आहे. नागपुरात दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. शहरातील दुकानदारांनी 18 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करावी, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मात्र, या निर्णयाला संदीप जोशी यांनी विरोध केला आहे (Nagpur Mayor Sandeep Joshi oppose Commissioner Tukaram Mundhe decision).

“कोरोना चाचणी न केल्यास दुकान बंद करण्यात येतील, हा महापालिकेचा तुघलकी निर्णय आहे. या निर्णयाबाबत अनेक व्यापारी संघटनांनी तक्रार केली आहे. नागपूर शहरात दररोज 5 हजार पेक्षा जास्त कोरोना टेस्ट होतात”, असं संदीप जोशी म्हणाले (Nagpur Mayor Sandeep Joshi oppose Commissioner Tukaram Mundhe decision).

“एकीकडे आधीच सम-विषम पद्धतीने दुकान उघडत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. त्यात आता अशाप्रकारचा निर्णय घेणं चुकीचं आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा. ज्यांना टेस्ट करायची आहे ते स्वत: करतील”, अशी टीका संदीप जोशी यांनी केली.

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांचा आकडा 11 हजारच्या उंबरठ्यावर आहे. तर कोरोना बळींची संख्या 400 पार गेल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणासाठी शहरातील सर्व दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

येत्या 18 ऑगस्टपर्यंत दुकानदारांनी आपली कोरोना चाचणी करुन चाचणीचं प्रमाणपत्र दुकानात ठेवायचं आहे. ज्या दुकानादराकडे कोरोना चाचणीचं प्रमाणपत्र दिसलं नाही, त्यांच्यावर नागपूर महानगरपालिका कारवाई करणार आहे.

नागपूर शहरात साधारण 30 हजार दुकानं आहेत. 70 ते 80 हजार दुकानदार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे. या सर्वांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सनेही दुकानदारांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

Published On - 9:10 pm, Thu, 13 August 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI