नागपूर हादरलं! हॉटेलमध्ये तीन तरुणी, आळीपाळीने लोक यायचे… निवासी परिसरातील धक्कादायक घटना
नागपुरातील एका निवासी भागात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी ऑपरेशन शक्ती मोहिमेअंतर्गत एका हॉटेलवर छापा टाकला, जिथून तीन मुलींना वाचवण्यात आले. यासोबतच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

नागपूर शहरातील एका शांत निवासी भागात सेक्स रॅकेटचा खुलासा झाला आहे. येथील प्रमीला प्रकाश हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले. पोलिसांनी येथून तीन मुलींना सुरक्षितपणे वाचवले आहे. पोलिसांनी ऑपरेशन शक्ती मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. या सेक्स रॅकेट कसे उघडकीस आहे चला जाणून घेऊया…
तीन मुलींची सुरक्षित सुटका
पोलिसांनी या प्रकरणाविषयी सांगितले की, या रॅकेटचे संचालक तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवत होते आणि त्यांच्याकडून देहविक्री करवून घेत होते. यामागे दोन मुख्य आरोपी आढळले आहेत. त्यामध्ये कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला यांचा समावेश आहे. या दोघांना पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली आहे.
वाचा: हिचे क्लिवेज बघ किती डिप; गायिकेने सांगितला पुण्यातल्या बालरोगतज्ज्ञासोबतचा वाईट अनुभव
बनावट ग्राहकाने उघड केले रॅकेट
खरे तर, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये तपास केला होता. बनावट ग्राहक तिथे पोहोचताच संपूर्ण रॅकेट उघडकीस आले. बनावट ग्राहकाने हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर तेथील लोकांसोबत संभाषण केले. त्यावेळी हॉटेल संचालकांचे सर्व कृत्य समोर आले. त्यानंतर मागून पोलिसांनी छापा टाकला. यावेळी तीन मुलींना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सांगितले की, ऑपरेशन शक्ती मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात मानव तस्करी आणि सेक्स रॅकेटविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. या छाप्यात हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि इतर पुरावेही पोलिसांनी जप्त केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण रॅकेटचे नेटवर्क उघड होईल.
पोलिसांचे म्हणणे आहे की, शहरातील कोणत्याही भागात आता बेकायदेशीर कामे खपवून घेतली जाणार नाही. या छाप्यातून हेही समोर आले की, रॅकेट संचालक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलींना सहजपणे फसवतात. तसेच त्यांच्यावर दबाव टाकतात.
