Rajesh Tope | नागपुरात थॅलेसेमियाच्या 4 रुग्णांना HIV ची लागण; राजेश टोपे म्हणतात, चौकशी करून दोषींवर कारवाई करणार

रक्त देताना नॅट टेस्टेट रक्त द्यावं लागतं. पण, काही रक्तपेढ्या अशाप्रकारची चाचणी करत नसल्यास असा धोका संभवतो. ही गंभीर बाब आहे. यावर आरोग्य मंत्र्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. यात कुणी दोषी आढळून येत असेल, तर त्यावर नियमानुसार कारवाई करू, असं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत.

Rajesh Tope | नागपुरात थॅलेसेमियाच्या 4 रुग्णांना HIV ची लागण; राजेश टोपे म्हणतात, चौकशी करून दोषींवर कारवाई करणार
नागपुरात थॅलेसेमियाच्या 4 रुग्णांना HIV ची लागण
गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 23, 2022 | 5:17 PM

नागपूर : नागपुरात तीन वर्षांच्या मुलीला ब्लड बँकेतून रक्त मिळाले. या रक्तातून एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक बाब पुढे आलीय. थॅलेसेमिया (Thalassemia) या गंभीर रक्ताच्या आजाराशी चिमुकली तोंड देत होती. या चिमुकलीला कुठल्यातरी ब्लड बँकेतून रक्त देण्यात आली. या रक्तातून एचआयव्हीची लागण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री (Health Minister) राजेश टोपे यांनी दिलेत. थॅलेसेमिया आजारामुळे या तीन वर्षीय चिमुकलीला वारंवार रक्त द्यावं लागतंय. सरकारकडून थॅलेसेमियाच्या रुग्णांना खासगी आणि सरकारी रक्तपेढीतून मोफत रक्त देण्यात येते. परंतु हे रक्त नॅट टेस्टेड (NAT TESTED) नसल्याने थॅलेसेमियाच्या रुग्णांना एचआयव्हीचा धोका निर्माण झालाय. या तीन वर्षांच्या चिमुकलीला आठ महिन्यांपूर्वी मुलीला एचआयव्ही झाल्याचे निदान झाले.

रक्तातून एचआयव्हीची लागण

आधीच थॅलेसेमियाचा गंभीर आजार आहे. त्यात एचआयव्हीची लागण झाल्याने मुलीच्या जीवाला धोका निर्माण झालाय. नागपुरातीलच थॅलेसेमियाग्रस्त चार मुलांना रक्तातून एचआयव्हीची लागण झाल्याचीही माहिती आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिलेत. थॅलेसेमियाग्रस्त व्यक्तीला नेहमी रक्त द्यावं लागते. यासाठी ते सरकारी किंवा खासगी रक्तपेढीचा आधार घेतात. त्यातून रक्त देत असताना ही लागण झाल्याची माहिती आहे. रक्त योग्य पद्धतीनं द्यावं लागतं. त्याची काही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यास अशाप्रकारचा धोका निर्माण होतो.

याला जबाबदार कोण

रक्त देताना नॅट टेस्टेट रक्त द्यावं लागतं. पण, काही रक्तपेढ्या अशाप्रकारची चाचणी करत नसल्यास असा धोका संभवतो. ही गंभीर बाब आहे. यावर आरोग्य मंत्र्यांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. यात कुणी दोषी आढळून येत असेल, तर त्यावर नियमानुसार कारवाई करू, असं आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें