Nagpur ST | 500 एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी पैसे गोळा केले, अजय गुजर यांच्याकडे जमा केल्याची प्रवीण घुगे यांची माहिती

नागपुरात 500 एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी पैसे अजय गुजर यांच्याकडे जमा केले. एसटी कर्मचारी प्रवीण घुगे यांनी ही माहिती दिली. याप्रकरणी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

Nagpur ST | 500 एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी पैसे गोळा केले, अजय गुजर यांच्याकडे जमा केल्याची प्रवीण घुगे यांची माहिती
नागपुरात 500 एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनासाठी पैसे अजय गुजर यांच्याकडे जमा केले
Image Credit source: t v 9
गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Apr 13, 2022 | 9:58 AM

नागपूर विभागातील साधारण एक हजार एसटी कर्मचारी संपावर होतो. यापैकी साधारण 500 कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी 300 म्हणजेच विभागातून दीड लाख रुपये गोळा झाले. पण गोळा झालेले हे पैसे ॲड. सदावर्ते यांना नाही तर अजय गुजर यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन लढ्यासाठी (Court battle) दिले. 1540 रुपये अजय गुजर (Ajay Gujar) यांना ॲानलाईन दिले. याचा पुरावा टीव्ही 9 कडे आहेत. तर उरलेले कॅश दिल्याचं कर्मचारी सांगतात. असा दावा नागपुरातील एसटी कर्मचारी प्रवीण घुगे (Praveen Ghuge) यांनी केलाय. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांकडून नेमके कुणी कुणी पैसे गोळा केले? यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. याप्रकरणी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांची चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांची चौकशी करा

एसटी कामगारांच्या पाच महिन्यातील आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून प्रत्येकी 550 रुपये घेतल्याचे उघड झाले आहे. जवळपास 70 ते 75 हजार एस. टी. कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोघांना या वसुलीतील किती हिस्सा मिळाला? कशाच्या आधारे ही वसुली केली? याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

वसुलीतील हिस्सा मिळाला का?

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, हजारो एस. टी. कामगारांनी त्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात पाच महिने आंदोलन केले. महाविकास आघाडी सरकार या कामगारांच्या पाठीशी पहिल्यापासून खंबीरपणे उभे होते. पगारवाढीसह त्यांच्या इतर मागण्याही मान्य केल्या आहेत. परंतु यादरम्यान कामगारांकडून प्रत्येकी 550 रुपये घेतले गेल्याचे उघड झाले आहे. काही एस. टी. कामगारांनी त्यांच्याकडून पैसे घेतल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. या दोन्ही आमदारांना या वसुलीतील हिस्सा मिळाला का? मिळाला असेल तर कोणत्या आधारे त्यांनी ही वसुली केली ? या वसुलीतील वाटपावरूनच सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांचे वकील सदावर्ते गुणरत्ने यांच्याशी वाद होऊन बाहेर पडावे लागले का, याचा खुलासा झाला पाहिजे असे लोंढे म्हणाले.

Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल

Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें