Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल

नागपुरात सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओत सात मुली एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. त्यांची झटापट पाहून व्हिडीओ काढण्याचा मोह झाला असावा. ही फ्रिस्टाईल मारहाण आहे. हिस्लॉप कॉलेज रोडवरील दृश्य आहे.

Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल
नागपुरात युवतींमध्ये फ्रिस्टाईल.
Image Credit source: tv 9
सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Apr 12, 2022 | 5:01 PM

नागपूर : नागपुरातील मुलीच्या दोन गटांत झालेल्या मारपीटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सात मुली एकमेकींना मारहाण (freestyle ) करताना दिसून येत आहेत. हिस्लॉप कॉलेज रोडवरील (Hislop College Road) व्हिडीओ असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना कशामुळे घडली याची अद्याप निश्चिती झालेली नाही. पोलिसांकडे अजून कुठलीही तक्रार आली नाही. त्यामुळे कुठल्या कारणाने ही मारहाण झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. मुलींच्या दोन गटात ही हाणामारी होत आहे. अतिशय वाईट पद्धतीने रस्त्यात मारहाण करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. अश्लील शिवीगाळ सुद्धा या मुली करत आहेत. महाविद्यालयीन मुली असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने उपस्थितांपैकी एकाने हा व्हिडीओ शूट केला असावा. सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

माजी सैनिक विश्रामगृहासमोरील घटना

नागपुरात सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. या व्हिडीओत सात मुली एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत. त्यांची झटापट पाहून व्हिडीओ काढण्याचा मोह झाला असावा. ही फ्रिस्टाईल मारहाण आहे. हिस्लॉप कॉलेज रोडवरील दृश्य आहे. हा तेरा सेकंदाचा व्हिडीओ आहे. दोन मुली एक मुलीला मारहाण करत आहेत. दुसरीकडं दोन-दोन मुलींमध्ये चांगचीच झटापट होत आहे. एकीला खाली पाडून दोन जणी तिला मारहाण करत आहेत. बाजूलाच दोन-दोन मुलींमध्ये चांगलीच हाणामारी होत आहे. रस्त्याच्या बाजूला माजी सैनिक विश्रामगृह असं ठिकाण दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

चांगलीच झटापट

या मुली एकमेकींच्या केस धरताना दिसत आहेत. मुलींनी वापरलेल्या ड्रेसवरून या मुली कॉलेजच्या असाव्यात, असं वाटतं. जिन्स पँट वापरलेल्या आहेत. एकदम हातापायांवर आलेल्या आहेत. एकमेकींना चितपटही करत आहेत. चांगलीच झटापट त्यांच्यात होत आहे. बाजूला काही दुचाकी दिसतात. तिथून काही जण व्हिडीओ शुटिंग करत आहेत. एका मुलीच्या पाठीवर बॅग आहे. तरीही ती दुसरीशी लढण्यासाठी सज्ज आहे.

NCP’s mission | राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन विदर्भ! पश्चिम विदर्भात शरद पवार घेणार शिबिर, जयंत पाटलांची माहिती

Sujat Ambedkar: ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा असावं लागतं, मनसे, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा

Sushil Kumar Shinde: यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें