AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: देशमुखांनंतर नागपुरचा दुसरा बडा नेता ईडीच्या रडारवर; राऊतांविरोधात ईडीकडे तक्रार

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यानंतर आता राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊतही ईडीच्या रडावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. (nitin raut)

VIDEO: देशमुखांनंतर नागपुरचा दुसरा बडा नेता ईडीच्या रडारवर; राऊतांविरोधात ईडीकडे तक्रार
Nitin Raut
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 5:15 PM
Share

नागपूर: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यानंतर आता राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊतही ईडीच्या रडावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. रेती, कोळसा आणि जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी नितीन राऊत यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. तरुण परमार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे राऊत यांची ईडीकडून चौकशी होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (after anil deshmukh adv tarun parmar filed complaint against minister nitin raut to ED)

आरोप काय?

अॅड. तरुण परमार यांनी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडीकडे तक्रार केली आहे. या दोन्ही नेत्यांवर अधिकाऱ्यांच्या संगनमताने रेती, कोळसा, जमिनीत गैरव्यवहार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. परमार यांच्या या तक्रारीची गंभीरपणे दखल घेऊन ईडीने परमार यांना समन्स बजावून मुंबईला जवाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. या प्रकरणी ईडीला पुरावे दिल्याचा दावा परमार यांनी केला आहे.

आणखी कागदपत्रे घेणार?

परमार यांनी 28 जून रोजी ईडीला महत्त्वाची कागदपत्रे दिली आहेत. त्यांची ईडीने तीन तास चौकशीही केली. तसेच त्यांच्याकडून येत्या 5 जुलै रोजी अधिक कागदपत्रे घेण्यात येणार आहेत. त्यासाठी परमार यांना पुन्हा ईडीकडून बोलवणं येण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली.

मनी लॉन्ड्रिंग आणि हवालाद्वारे भ्रष्टाचार

विद्यमान मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिल देशमुख, नागपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि राऊत यांचे पीए आदींविरोधात मी तक्रार केली होती. त्यामुळे मला ईडीने समन्स बजावून बोलावलं होतं. मी त्यांना भेटलो. माझी साक्ष दिली आणि काही कागदपत्रे दिली, असं परमार म्हणाले. भ्रष्टाचार, हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप मी केले आहेत. मनी लॉन्ड्रिंग आणि हवालाद्वारे कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला आणि त्या पैशाचा कसा कसा कुठे कुठे वापर झाला याची माहिती मी ईडीला दिली आहे. मी कागदपत्रं दिली आहेत. ईडी संतुष्ट आहे. त्यांनी अजून कागदपत्रे मागितली तर पुन्हा देईल, असंही त्यांनी सांगितलं. ईडीने कारवाई केली नाही, तर पुढे काय करायचं त्याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोण आहेत परमार?

तरुण परमार हे नागपूरमधील वकील आहेत. ते केंद्र सरकारच्या एमएसएमई विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी राऊत यांच्यासह अनिल देशमुख यांच्याविरोधातही तक्रार केली आहे. तसेच या घोटाळ्यात राऊत यांचा मुलगाही असल्याचा दावा परमार यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुनगंटीवार, दरेकर काय म्हणाले?

नितीन राऊत यांच्या विरोधात अधिकाऱ्यांशी संगनमत करून अपहार केल्याची तक्रार ईडीकडे दाखल करण्यात आली आहे. यावर राज्याचे माजी अर्थमंत्री, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केवळ तक्रारच महत्त्वाची नाही. यासंबंधी कागदपत्रे व निश्चित पुरावे असल्याशिवाय ही चौकशी गंभीर आहे, असं म्हटलं जाऊ शकत नाही, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. तर, अशा प्रकारच्या तक्रारी नियमितपणे होत असतात. या देशात कुणीही कुणाची तक्रार करू शकतो. यंत्रणा त्या संदर्भात तपास करत असतात, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.

परमारांच्या त्या आरोपाचे काय झाले?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परमार यांच्या आरोपावरून भाजपवरच सवाल केला आहे. परमार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यावर आरोप केले होते. त्यावेळी ईडी किंवा सीबीआय आडवी येत नव्हती. फडणवीस त्यावेळी प्रत्येकाला निर्दोष असल्याचं सर्टिफिकेट देत होते, असं सांगतानाच सध्या मोदींचे सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून त्यांना बोथट करण्याचे पाप करत आहे, असा आरोप पटोले यांनी केला. (after anil deshmukh adv tarun parmar filed complaint against minister nitin raut to ED)

संबंधित बातम्या:

VIDEO: राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय?; ‘त्या’ पत्रावरून संजय राऊतांचा सवाल

ओबीसी आरक्षण राज्याच्या नव्हे, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने रद्द; नवाब मलिकांचा राज्यपालांना टोला

केंद्राला काय करायचं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(after anil deshmukh adv tarun parmar filed complaint against minister nitin raut to ED)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.