‘तुम्ही मुख्यमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून रेटून बोलतात’, अजित पवार यांची विधानसभेत जबरदस्त फटकेबाजी

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे बोलतात, सर्वजण टाळ्या आणि बाकं वाजवतात. देवेंद्रजी माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते त्यावेळेस एकही भाजपवाला टाळी वाजवत नाही", असं अजित पवार सभागृहात म्हणाले.

'तुम्ही मुख्यमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असून रेटून बोलतात', अजित पवार यांची विधानसभेत जबरदस्त फटकेबाजी
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 6:07 PM

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत चांगलीच टोलेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा सभागृहात कोट्यवधींचा प्रस्ताव मांडतात तेव्हा भाजपचे आमदार टाळ्या वाजवत नाहीत, असा दावा अजित पवारांनी विधानसभेत केला. तसेच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना आक्रमकपणे विधानसभेत भूमिका मांडतात. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्या आक्रमकपणे बोलत नाहीत, असा दावा अजित पवारांनी यावेळी केला.

“अध्यक्ष महोदय, आज एक गोष्ट तुम्ही पाहिली का? आज दोन सत्ताधारी पक्षाचे गेल्या 15 दिवसांतले प्रस्ताव होते आणि एक विरोधी पक्षाचे प्रस्ताव होते. तीनचे उत्तर दोघांनी दिले. अजून एका विषयावर चर्चा होईल. पण मी बघत होतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमकपणे बोलतात, सर्वजण टाळ्या आणि बाकं वाजवतात. देवेंद्रजी माझा तुमच्यावर एक आक्षेप आहे, ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते त्यावेळेस एकही भाजपवाला टाळी वाजवत नाही”, असं अजित पवार सभागृहात म्हणाले.

“अध्यक्ष महोदय, तुम्ही टीव्हीमध्ये बघा. एक मिनिट, हरीश पिंपळे साहेब तुम्ही फक्त अधूनमधून वाजवायचे. तानाजीराव गेले. तानाजीरावांनी आमच्याच लोकांना सांगितलं की, टाळ्या वाजवा”, असा टोला अजित पवारांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

“देवेंद्रजी तुम्ही पाच वर्ष मुख्यमंत्री होता. मुख्यमंत्र्यांनी एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी, कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव सांगितले, तुम्हाला किती जणांनी टाळ्या वाजवले? राईट टू रिप्लाय देत असताना मला सांगा, तुम्ही इतके अस्वस्थ होत होता की, माझं तुमच्याकडे लक्ष होतं कारण तुम्ही माझ्याजवळ बसले आहात. त्यामुळे मी सारखा बारकाईन बघत होतो”, असं अजित पवार म्हणाले.

“मी चेष्टा करत नाही किंवा गंमतीने बोलत नाही. पण मी साधारण बघत होतो. मुख्यमंत्री कोट्यवधींच्या योजना सांगत असताना काय बोलायचे? अधिकारी काम करत आहेत, मान्यता देणार आहेत, कालबद्ध कार्यक्रम करतोय, कृतीबद्ध आराखडा तयार करतोय, योजना आणतोय, मंजुरी करण्यात आलेले आहेत, प्रस्ताव पाठवलेले आहेत, मान्यता मिळेल, दिल्लीला पाठवले आहे. मी प्रत्येक बाबतीत टिप्पणी करुन घेतलीय”, असं अजित पवारांनी सांगितलं.

‘तुम्ही मुख्यमंत्री आहात…’

“माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगण आहे, कुठलीही एखादी गोष्ट सांगत असताना, तुम्ही मुख्यमंत्री आहात, मान्यता करतो, प्रस्ताव पाठवला का? असं का बोलता? हे मी करणार, असं बोलाना. मान्यता वगैरे काय? तो तुमचा अधिकार आहे. म्हणे, मी कॅबिनेट पाठवतो. तुम्ही कशाला सांगता, कॅबिनेटला पाठवतो असं. मी कॅबिनेटमध्ये करुन घेणार, असं बोला. एक मेसेज लोकांमध्ये जायचे”, असं अजित पवारांनी म्हटलं.

“हे महाराज उपमुख्यमंत्री असताना रेटून बोलत आहेत. तुम्ही मात्र जरा मागे मागे येतायत”, असं अजित पवार म्हणाले.

“मला एवढंच माहितीय की, राज्याचे तुम्ही 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी आहात. तीन अतिशय महत्त्वाचे प्रस्ताव तुम्ही मांडले. ते प्रस्ताव देत असताना आख्खा महाराष्ट्र तुमच्या बोलण्याकडे बघत असतो. ते बघत असताना, कॅमेरा ज्यावेळेस तुमच्याकडे असतो त्यावेळेस तुमचाही चेहरा महाराष्ट्राला दिसत असतो. त्यावेळेस तुम्ही जे बोलत आहेत त्यावेळेस यांची प्रतिक्रिया काय आहे, ते चेहरा बघून जे विचार करणारे ते वेगळाच विचार करत असतात. तसं नाही, तुम्ही पुढच्यावेळेस बोलत असताना तुम्ही तात्पुरता वेगळ्या ठिकाणी बसवा आणि तुम्ही एकटे तिथे बसा. म्हणजे तुमचा एकटा चेहरा दिसेल”, असं अजित पवार म्हणाले आणि सभागृहात एकच हशा पिकला.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.