Chandrapur: धनकुबेर निवडणुकीच्या रिंगणात! चंद्रपूर महापालिकेत तब्बल ५३ कोट्यधीश मनपा निवडणुकीच्या मैदानात, भाजपचे किती उमेदवार करोडपती?
Chandrapur Crorepati Candidate: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत एक, दोन, तीन, 20 नव्हे तर इतके कोट्याधीश महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये भाजपच्या उमेदवारांचा वरचष्मा आहे. त्यामुळे हे उमेदवार निवडून आल्यास चंद्रपूर शहर हे स्मार्ट सिटी होणार का? असा सवाल विचारल्या जात आहे.

निलेश दChandrapur Municipal Corporation Election 2026: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत एक, दोन, दहा नव्हे तर तब्बल ५३ कोट्यधीश उमेदवार (Crorepati Candidate) मनपा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात ४५१ पैकी ५३ उमेदवार कोट्यधीश असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूक ही सर्वसामान्यांची राहिलेली नाही हे अधोरेखित होत आहे. धनकुबेरच निवडणुकीच्या रिंगणात असतील तर गरीब उमेदवारांचं राजकीय भविष्य काय असेल असा सवाल विचारला जात आहे.
भाजपचे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
कोट्यधीश असलेले बहुतांश उमेदवार भाजपशी संबंधित असून, काँग्रेस दुसर्या क्रमांकावर आहे. तर १६ अपक्ष उमेदवारही कोट्याधीश आहेत. विशेष म्हणजे निवडणूक लढविणाऱ्या अपक्ष १३ उमेदवारांकडे एकही रुपये नसल्याची नोंद शपथपत्रात करण्यात आली आहे. नामांकन अर्ज दाखल करताना, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवारांना शपथपत्र सादर करणे बंधनकारक आहे. १५ जानेवारी रोजी निवडणुकीसाठी ४५१ उमेदवारांनी महानगर पालिका निवडणूक प्रशासनाकडे शपथपत्र सादर केले.
त्यानुसार, उमेदवारांची ही माहिती प्रशासनाने परिशिष्ट-१ मध्ये प्रसिद्ध केली आहे.यामध्ये शैक्षणिक पात्रता, जंगम व स्थावर मालमत्ता, कर्ज, दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकेल, अशी गुन्हेगारी प्रकरणे व ज्या अपराधासाठी दोषी ठरविण्यात आले आणि एक वर्षे किंवा त्यापेक्षा कालावधीच्या कारावासाची शिक्षा झाले असेल, अशा प्रकरणांची नोंद करणे शपथपत्रात बंधनकारक होते.
अशोक चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचे मटण खाल्ले
चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी अशोक चव्हाण यांचा समाचार घेतला.चंद्रपुरातील छोटा बाजार परिसरात त्यांची सभा ही झाली.खा कुणाचेही मटण आणि दाबा कमळाचे बटण, असे वक्तव्य चव्हाण यांनी केल्याचे सांगितले. याच चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेसचे मटण खाल्ले आणि आता कमळाचे बटण दाबायला सांगत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी 151 पैकी 120 जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यांनी हा आकडा निवडणूक आयोग, मतांची चोरी, बोगस मतदार यांच्या भरवशावर दिला असावा ते भविष्यवेत्ते आहेत का? यंत्रणांच्या ,पैशाच्या बळावर त्यांनी हा आकडा आणला असेल, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र केवळ सत्तेसाठी येत आहेत. राष्ट्रवादी तशीही सत्तेच्या बाजूने असते. त्यांचा सत्ता हाच उद्देश आहे. आता पवारांना सत्तेत सामील व्हायचे असेल तर त्यांनी पुरोगामीत्व सोडले असे म्हणावे लागेल. त्यांनी शाहू- फुले -आंबेडकरांचे नाव घेऊ नये आणि आपल्या मागे हेडगेवार आणि गोळवलकरांचे फोटो लावावेत, अशी विखारी टीकाही वडेट्टीवार यांनी काल येथील सभेत केली.
