देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, एटीएसनं 11 बांग्लादेशींना घेतले ताब्यात

या महिलांना दलाल वेगवेगळ्या शहरात पाठविणार होता. बांगलादेशात गरिबीत जीवन जगणार्‍या या माहिला पैसे कमाविण्याच्या हव्यासापोटी भारतात आल्याचं सांगितलं जातंय.

देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, एटीएसनं 11 बांग्लादेशींना घेतले ताब्यात
crime


नागपूर : मंगळवारी रात्री गुन्हे शाखा व दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) रेल्वेस्थानकावर धाड टाकली. या धाडीत मुंबईमार्गे सूरतला जाणार्‍या 11 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. मानवी तस्करी आणि देहव्यापाराच्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या गुन्हेगारीचा छडा लागला आहे.
या महिलांना दलाल वेगवेगळ्या शहरात पाठविणार होता. बांगलादेशात गरिबीत जीवन जगणार्‍या या माहिला पैसे कमाविण्याच्या हव्यासापोटी भारतात आल्याचं सांगितलं जातंय. यापूर्वीही काही महिलांना अशाच प्रकारे अवैधरित्या भारतात आणण्यात आलं. काही काळ थांबल्यानंतर त्या परत गेल्या. दुसर्‍यांदा काम मिळण्याचा भरवसा दिल्यावर त्या परत आल्या.

एटीएसला मंगळवारी रात्री हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेसनं देहव्यापार तसेच दुसर्‍या कामासाठी महिलांना सूरतला नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली. एटीएसनं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात कारवाईची योजना आखण्यात आली. पंडित यांच्या नेतृत्वाखाली एटीएसच्या पथकानं नागपूर रेल्वेस्थानकावर धाड टाकली. ही गाडी मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्मवर पोहोचली. पोलिसांना इंजिनच्यानंतर असलेल्या कोचमध्ये महिला असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यासोबत महिला आणि एका व्यक्तीचा फोटोही होता. तो व्यक्ती आणि महिला रेल्वेगाडीच्या मागील कोचमध्ये त्यांना महिला सापडले.

पायी भारताच्या सीमेत केला प्रवेश

या कारवाईत पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतले. ते सूरतला जात असल्याचे चौकशीत पुढे आले. महिलांसोबत मुले आहेत. सर्व 22 नोव्हेंबरला रात्री रेल्वेने निघाले. त्यापूर्वी दोन ते तीन दिवस आधी ते बांगलादेशातून भारतात आले होते. त्यांनी पायी भारताच्या सीमेत प्रवेश केला. तेथील दलालानं हावड्याच्या दलालाचा नंबर दिला होता. दोन युवतींना अधिक पैसे कमावण्याचं आमिष देऊन इतर कामासाठी बोलाविण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पोलिसांनी हव्या असलेल्या आरोपींविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्या(पीटा)नुसार गुन्हा दाखल केला.

अभियंता युवतीचाही समावेश

हावडा आणि सूरतचा दलाल पकडला गेल्यानंतर या रॅकेटचा पर्दाफाश होऊ शकतो. पुरुषांना हावड्याच्या दलालानं बनावट आधारकार्ड तयार करून दिले. आधारकार्ड बनविण्यासह ठरलेल्या शहरात पोहोचविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडून पैसे घेण्यात आले होते. देहव्यापारात अडकलेली एक युवती अभियंता आहे. दिसायला सुंदर असलेली ही युवती बांगलादेशातही देहव्यापार करीत होती, असे सांगितलं जात आहे.

Nagpur चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगणे भोवले

MLC Election महाविकास आघाडी-भाजपच्या उमेदवारांकडे नाही स्पष्ट बहुमत, वंचित बहुजन आघाडी व अपक्ष ठरणार निर्णायक

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI