Nagpur पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गौंडखैरी येथे भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

Nagpur पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती, शिक्षणाधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

नागपूर : कोविड महामारीनंतर प्रथमच पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा काल सुरु झाल्या. पावणेदोन वर्षे घरी बसलेल्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण भागातील शाळेत पहिल्याच दिवशी 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक चिंतामण वंजारी यांनी कळमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गौंडखैरी येथे भेट देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

जिल्ह्यातील 64 हजार 780 विद्यार्थी शाळेत

नागपूर जिल्ह्यातील कोविड प्रोटोकॉल पाळत इयत्ता 1 ते 4 पर्यंत वर्गाची सर्व शाळांची सुरुवात कालपासून झाली. ग्रामीण भागातील 13 तालुक्यातील 2021 शाळांपैकी 1898 शाळा सुरु झाल्या आहेत. ग्रामीण भागात 1 लाख 28 हजार 91 विद्यार्थी असून त्यापैकी 64 हजार 780 विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित होते. तर 5 हजार 956 पैकी 5 हजार 569 शिक्षक उपस्थित होते. नागपूर महानगरपालिका वगळून शहरी भागातील इयत्ता 1 ते 7 च्या सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. इयत्ता 1 ते 7 च्या 287 शाळेपैकी 251 शाळा सुरु झाल्या असून, 52 हजार 661 विद्यार्थ्यांपैकी 17 हजार 774 विद्यार्थी उपस्थित होते. तर 2 हजार 203 शिक्षकांपैकी 1 हजार 549 शिक्षक शाळेत उपस्थित होते.

 

शहरातील शाळांबाबत 10 डिसेंबरला निर्णय

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळं नागपूर महानगरपालिकेने मनपा क्षेत्रातील इयत्ता 1ली ते 7 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास 10 डिसेंबर 2021 पर्यंत स्थगिती दिली आहे. कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन 10 डिसेंबरनंतर याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्यात येईल. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मंगळवारी (ता. 30) यासंबधीचे आदेश जारी केले आहे. मात्र मनपा क्षेत्रातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.

 

ऑनलाईन वर्ग सुरूच

महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासंदर्भात सूचना दिली होती. मनपा आयुक्तांनी कोरोना विषाणुची परिस्थिती लक्षात घेता शाळा सुरु करण्याचा निर्णयावर स्थगिती दिली आहे. मंगळवारी निघालेल्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली ते 7 वी पर्यंतचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र या वर्गांचे ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.

Nagpur महाआवास अभियान : 2 लाख 23 हजार घरकुले पूर्ण, भूमिहीन कुटुंबांना प्राधान्य

Nagpur अवयवदान श्रेष्ठ दान : किडनी आणि यकृत दानातून दोघांना जीवनदान

Published On - 6:12 am, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI