Nagpur | ‘संक्रांत’ येऊ नये म्हणून सावध व्हा! नायलॉन मांजाने गळे कापणे सुरूच; पोलिसांची धडक कारवाई

पतंग उडविण्याची हौस कुणावर बेतेल काही सांगता येत नाही. नायलॉन मांजावर धडक कारवाई करणे सुरूच आहे. तरीही नायलॉन मांजाने गळे कापणे काही सोडले नाही. म्हणून प्रवास करताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

Nagpur | 'संक्रांत' येऊ नये म्हणून सावध व्हा! नायलॉन मांजाने गळे कापणे सुरूच; पोलिसांची धडक कारवाई
नायलॉन मांजावर जप्तीची कारवाई करणारे पोलीस.

नागपूर : नायलॉन मांजाविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासन जोमात कामाला लागले आहेत. ते रोज कुणावर ना कुणावर तरी कारवाई करतात. पण, तरीही काही पतंगबाज लोकं जुगाड करतात. नायलॉन मांजा उडवितात आणि सामान्य प्रवाशांचे गळे कापण्याचा जीवघेणा खेळ संक्रांत संपल्याशिवाय थांबेल असे वाटत नाही. म्हणून रस्त्याने जाताना सावध होऊन वाहन चालविणे आवश्यक आहे.

32 ठिकाणी छापामारी, 16 लाखांचा माल जप्त

प्रतिबंधित नायलॉन मांजा विरोधात गुन्हे शाखा पोलिसांनी मोहीम छेडली. विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करत 12 विक्रेत्यांवर नागपूर गुन्हे शाखेने गुन्हे दाखल करून 400 नायलॉन मांजा बंडल जप्त केले आहेत. नायलॉन मांजामुळं होणाऱ्या अपघाताची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूने अवैद्य पद्धतीने नायलॉन मांजा विक्री देखील शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे. नागपूर खंडपिठाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेने एकाच दिवसात 12 विक्रेत्यांवर कारवाई करत 400 नायलॉन मांजा बंडल जप्त केले. गेल्या 28 दिवसांत शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीतील 32 ठिकाणी छापामार कारवाई केली. 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका बाजूने पोलीस कारवाई करत असताना देखील दुकानदार छुप्या पद्धतीने अजूनही नायलॉन मांजा विकत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं नागरिकांनी आता समजदारी दाखवून आपली पतंग उडविण्याची हौस दुसऱ्याच्या जिवावावर उठणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे, असे गुन्हे शाखेचे प्रदीप रयनावार यांनी सांगितलं.

 

बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह विहिरीत सापडला

पतंग आणि मांजा पकडण्याचा मोह एका नऊ वर्षीय चिमुकल्याच्या जीवावर बेतला. मुलगा आढळून आला नाही म्हणून वडिलांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. परंतु, हा चिमुकला एका विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. पारडीतील आकाश संजय बोरकर असे या चिमुकल्याचे नाव आहे. बाहेर पडलेला आकाश घरीच आला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. काही केल्या आकाश सापडत नसल्यामुळे अखेर घरच्यांनी पोलिसात त्याच्या हरविल्याबाबतची तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आकाशची शोधमोहीम राबविली. पोलिसांनी बोरकर यांच्या घराजवळील एका विहीर व नाल्याचीही तपासणी केली. परंतु, आकाश कुठेही दिसून आला नाही. दरम्यान, आकाशच्या वडिलांनी त्यांच्या घरामागे असलेल्या बारदान्याचा गोदामातील विहिरीत डोकावले असता त्यांना जो नजारा दिसला तो त्यांना धक्का देणारा होता. त्यांचा आकाश विहिरीत पडला असून, त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता.

Cold | विदर्भ गारठले : थंडी, पावसाचा विचित्र संगम; पिकांवर काय होणार परिणाम?

Nagpur | पालकमंत्री राऊतांनी घेतला बुस्टर डोज; आणखी कोणकोण आहेत बुस्टरसाठी फ्रंटलाईनवर?

corona | नागपुरात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर; एनडीआरएफच्या जवानांनाही लागण!

Published On - 12:34 pm, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI