corona | नागपुरात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर; एनडीआरएफच्या जवानांनाही लागण!

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोमवारी तब्बत 971 नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यातच एनडीआरएफच्या 22 जवानांना कोरोनाची लागण झाल्यानं चिंता वाढली आहे.

corona | नागपुरात कोरोना बाधितांची रुग्णसंख्या हजाराच्या उंबरठ्यावर; एनडीआरएफच्या जवानांनाही लागण!
CORONA AND DOCTOR

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दुसऱ्या लाटेनंतर सोमवारी उच्चांक पाहावयास मिळाला. जिल्ह्यात तब्बत 971 नव्या बाधितांची भर पडली आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य विभागही अलर्टवर आला आहे. एनडीआरएफच्या 22 जवानांना कोरोनाची लागण झाली. नॅशनल डिजास्टर रिस्पॅान्स फोर्स अकॅडमीत हे जवान प्रशिक्षण घेत होते. कोरोनाबाधित जवानांना क्वारंटाईन करण्यात आलंय.

कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 9.86 टक्के

सोमवारी जिल्ह्यात 9 हजार 852 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये शहरात 8 हजार 717 व ग्रामीणमध्ये 1 हजार 135 चाचण्यांचा समावेश आहे. त्यापैकी 9.86 टक्के म्हणजेच तब्बल 971 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आले. यामध्ये शहरातील 792, ग्रामीणमधील 117 व जिल्ह्याबाहेरील 62 जणांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4.98 लाख 559 वर गेली आहे. दिवसभरात शहरातून 107, ग्रामीणमधून 8 व जिल्ह्याबाहेरील 43 असे 158 जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. परंतु बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटून 97.14 टक्क्यांवर आले आहे.

सक्रिय रुग्णसंख्या चार हजार 158

कोरोनामुक्तांचे प्रमाण घटल्याने सक्रिय (अक्टिव्ह) रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 3 हजार 556, ग्रामीणमध्ये 550 व जिल्ह्याबाहेरील 52 असे 4 हजार 158 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी बहुतांशी रुग्णांना सौम्य स्वरूपाची लक्षणे किंवा लक्षणेच नसल्याने ते गृहविलगीकरणात आहेत. सोमवारी दिवसभरात एकाच्याही मृत्यूची नोंद झाली नाही, ही एक दिलासा देणारी बाब आहे.

नियम पाळण्याचे प्रशासनाकडून आवाहन

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना नियम पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सोमवारी मनपाच्या उपद्रव शोधपथकाने दिवसभरात विनामास्क फिरणार्‍या 60 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 60 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियमांचे आणि निर्बंधांचे पायबंध घालून राज्य सरकार नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा करत आहे. परंतु, बाजारांमध्ये वाढती गर्दी आणि नागरिकांच्या बेशिस्तपणा बघता निर्बंध दिवसेंदिवस कठोर होत चालले आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने नागरिकांनी सरकारला सहकार्य करण्याची गरज आहे.

ओमिक्रॅानच्या 21 नव्या रुग्णांची भर

नागपूर जिल्ह्यात रविवारी ओमिक्रॅानच्या 21 नव्या रुग्णांची भर पडली. जिल्ह्यात ओमिक्रॅानची रुग्णसंख्या 51 वर पोहोचली. नागपूर जिल्ह्यात रविवारी 832 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. 10 हजार 776 चाचण्यांमधून 832 जणांचे रिपोर्ट पॅाझिटीव्ह आले होते. तर जिल्ह्यातील 98 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती.

Bhandara | भंडाऱ्यातील जळीत प्रकरणाला एक वर्ष पूर्ण; कसा झाला होता 11 बालकांचा होरपळून मृत्यू?

Nagpur ST | नागपुरात एसटी कर्मचाऱ्याने उचलले घातक पाऊल; का केला आत्महत्येचा प्रयत्न?

नागपुरात सैन्यातील जवानाकडे सोन्याचं बिस्कीट सापडलं, धड उत्तर देईना, मग RPF जवानांनी…

 

Published On - 9:00 am, Tue, 11 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI